Tarun Bharat

खानापूर नगरपंचायत नगराध्यक्षपदी डॉ.उदयसिंह हजारे : उपनगराध्यक्षपदी सुवर्णा कांबळे

खानापूर : प्रतिनिधी

खानापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार अनिलभाऊ बाबर व नियोजन समिती सदस्य सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेना- काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. उदयसिंह विजयसिंह हजारे हे एका मताने विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या सुवर्णा प्रल्हाद कांबळे या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. या निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

खानापूर नगरपंचायतची पंचवार्षिक निवडणूक मागील महिन्यात पार पडली. यात शिवसेना- काँग्रेस महाविकास आघाडीचे नऊ नगरसेवक निवडून आले तर जनता आघाडीचे सात व एक अपक्ष निवडून आले होते. नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे डॉ उदयसिंह हजारे व सुनिल मंडले यांनी तर जनता आघाडीतर्फे राजेंद्र माने व आनंदराव जंगम यांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी अर्ज माघारी दिवशी सुनील मंडले व आनंदराव जंगम यांनी अर्ज माघारी घेतले. शुक्रवारी नगरपंचायत सभागृहात पार पडलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे डॉ उदयसिंह हजारे यांनी जनता आघाडीचे उमेदवार राजेंद्र माने यांच्यावर एका मताने विजय मिळवला. तर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सुवर्णा प्रल्हाद कांबळे यांना ९ मते तर जनता आघाडीच्या रोहित त्रिम्बके यांना ८ मते मिळाली. निवडीनंतर आमदार अनिलभाऊ बाबर व सुहास शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत शहरातून विजयी मिरवणूक काढली.

Advertisements

Related Stories

हरियाणात शेतकऱ्यांची महापंचायत

Patil_p

कसबा बीड गावचे कॉम्रेड नामदेवराव गावडे यांचे अकाली निधन

Sumit Tambekar

‘१५ लाखांसाठी भारतीय सात वर्षांपासून थांबलेत; थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा’

Abhijeet Shinde

तौक्ते चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे कंट्रोल रुममध्ये

Abhijeet Shinde

गारगोटीत कंत्राटदाराची कार फोडून जीवघेणा हल्ला

Sumit Tambekar

दुधगाव येथे विविध विकासकामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!