Tarun Bharat

खानापूर बँकेच्या चेअरमनपदी अमृत शेलार

व्हा. चेअरमनपदी अंजली कोडोळी यांची निवड

प्रतिनिधी /खानापूर

खानापूर को-ऑप. बँपेच्या चेअरमनपदी अमृत महादेव शेलार यांची तर व्हाईस चेअरमनपदी अंजली चंद्रकांत कोडोळी यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून शंकर करबसन्नावर उपस्थित होते.

यापूर्वीचे चेअरमन परशराम रामचंद्र गुरव तसेच व्हा. चेअरमन अंजनाताई मऱयाणी गुरव यांनी राजीनामा दिल्याने ती दोन्ही पदे रिक्त झाली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर नवीन चेअरमन, व्हा. चेअरमनची निवड होईपर्यंत रमेश शटवाप्पा नार्वेकर यांची हंगामी चेअरमनपदी निवड करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी चेअरमनपदासाठी अमृत शेलार, डॉ. चंद्रकांत पाटील व रमेश नार्वेकर असे तीन अर्ज दाखल झाले होते. व्हा. चेअरमनपदासाठी अंजली कोडोळी यांचा अर्ज दाखल झाला होता. चेअरमनपदासाठी अर्ज पेलेले डॉ. चंद्रकांत पाटील व रमेश नार्वेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर निवडणूक अधिकाऱयांनी चेअरमनपदी अमृत शेलार व व्हा. चेअरमनपदी अंजली कोडोळी यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

उभयतांच्या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करणारी ज्येष्ठ संचालक डॉ. चंद्रकांत पाटील, आर. जी. देसाई तसेच विजय गुरव यांची भाषणे झाली. यावेळी नूतन चेअरमन अमृत शेलार यांनी संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास ठेवून बिनविरोध निवड केल्याबद्दल धन्यवाद दिले. संचालक मंडळाने ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून बँकेच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीन, अशी ग्वाही दिली. बँकेच्या कर्मचाऱयांच्यावतीने मुख्य व्यवस्थापक नंदकुमार खटोरे यांनी नूतन चेअरमन व व्हा. चेअरमनचे अभिनंदन केले.

 यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक परशराम रामचंद्र गुरव, शिवाजी चुडाप्पा पाटील, रमेश शटवाप्पा नार्वेकर, मेघशाम जोतिबा घाडी, मारुती पाटील, अंजनाताई गुरव व शिवाप्पा पाटील उपस्थित होते.

Related Stories

बदलत्या हवामानाने रब्बी हंगाम संकटात

Patil_p

एमसीसीसी अ, अर्जुन स्पोर्ट्स युनियन जिमखाना संघ विजयी

Amit Kulkarni

अपहरण प्रकरणात पोलिसांचा कानाला खडा!

Amit Kulkarni

बेळगावात मांजा विक्री करताना आढळल्यास दुकानदारावर कारवाई

mithun mane

महाराष्ट्र कर्नाटक राज्यपालांच्या बैठकीला प्रारंभ

mithun mane

विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई

Amit Kulkarni