Tarun Bharat

खानापूर मलप्रभा नदीत वडगावचा युवक बुडाला

खानापूर

तालुक्मयातील मलप्रभा नदीच्या हालात्री नाल्याच्या संगम जवळ असलेल्या टुरिस्ट स्पॉट जवळ सुट्टीच्या दिवशी आपल्या मित्रांसमवेत आलेल्या बेळगाव वडगाव येथील एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 1 च्या सुमारास घडली या घटनेत बुडून मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव मंजुनाथ मल्लकार्जुन सातपुते (रा. रणझुंजार कॉलनी, वडगाव वय 27) असे असून तो वडगाव येथील रहिवासी आहे. सदर युवक वडगाव केएलई येथे लॅब टेक्नीशियन होता असे समजते. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ  असा परिवार आहे.                याबाबत हकीकत की रविवारी सुट्टीचा दिवस साधून सदर मंजुनाथ सातपुते व विविध ठिकाणी टेक्नािशियन व  वैद्यकीय सेवा बजावणारे अन्य सहा मित्र रविवार सुट्टीचा दिवस साधून आनंद लुटण्यासाठी खानापूर शेडेगाळी जवळील मलप्रभा नदीच्या हालात्री नाला संगम टुरिस्ट स्पॉट वर आले होते  सदर मंजुनाथ नदीच्या पत्रात आंघोळ करत असताना बुडत असल्याचे लक्षात येतात सोबत असलेल्या मित्रांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केले पण तो हाती लागला नसल्याने तातडीने खानापूर अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले व पाण्यातून मंजुनाथ सातपुते याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला

Related Stories

दहावी पुरवणी परीक्षा 27 जूनपासून

Amit Kulkarni

बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

Tousif Mujawar

कार्तिक स्वामी दर्शनासाठी भाविकांची रीघ

Patil_p

अभिव्यक्ती स्वातंत्र्य डावलने हे घटनाबाहय़

Patil_p

सायकलवरून कणबर्गी-पंढरपूर वारी

Amit Kulkarni

नियमांचे पालन करुन स्वातंत्र्योत्सव

Patil_p