Tarun Bharat

खानापूर म.ए. समितीचा शुभम शेळके यांना पाठिंबा

Advertisements

बहुमताने विजयी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार : खानापूर शिवस्मारकात बैठक

बातमीदार / खानापूर

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. खानापूर येथील राजा शिवछत्रपती शिवस्मारकात  मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव होते. बेळगाव पोटनिवडणुकीत उभे असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना पाठिंबा देण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीला म. ए. समितीचे चिटणीस गोपाळ देसाई, मार्केटिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील, म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मारुती परमेकर, म. ए. समितीचे सदस्य जगन्नाथ बिर्जे, सूर्याजी पाटील, तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, मार्केटिंग सोसायटीचे संचालक पी. एच. पाटील, हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजीत पाटील, कृष्णकांत बिर्जे, युवा समितीचे विनायक सावंत, राजू पाटील, पुंडलिक पाटील, राजाराम गावडे, वासुदेव पाटील, रवी पाटील, गोपाल पाटील, किशोर हेब्बाळकर, संभाजी देसाई, ज्ञानेश्वर सनदी तसेच म. ए. समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

खानापूर तालुक्मयातील नातेवाईक बेळगाव लोकसभा मतदारसंघात आहेत. त्यांना विनंती करून शुभम शेळके यांनाच मतदान करण्यासाठी विनंती करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

Related Stories

अवयवदान जागृतीसाठी केएलईतर्फे सायकल फेरी

Amit Kulkarni

जीएसएस कॉलेजला एनसीसीमध्ये पुरस्कार

Amit Kulkarni

खानापूर-पारिश्वाड रस्त्यावरील अपघातात शेतकरी जागीच ठार

Patil_p

देशमुख रोड येथील पथदीप दिवसाही सुरूच

Amit Kulkarni

धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाला प्रारंभ

Amit Kulkarni

घरभाडय़ासाठी तगादा लावू नये

Patil_p
error: Content is protected !!