Tarun Bharat

खानापूर रोडवरील कुंटणखान्यावर धाड

Advertisements

टिळकवाडी पोलिसांची कारवाई : घरवालीला अटक

प्रतिनिधी/ बेळगाव

खानापूर रोडवरील उच्चभ्रू वस्तीतील एका अपार्टमेंटवर धाड टाकून कुंटणखाना चालविणाऱया एका महिलेला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

आश्रय एम्पायर अपार्टमेंटमध्ये हा प्रकार चालत होता. दीपा वेंकटेश पाच्छापूर (वय 37, रा. चन्नम्मानगर, सध्या रा. आश्रय एम्पायर अपार्टमेंट) असे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी शनिवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

आश्रय एम्पायरमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून दीपाला अटक केली. या कारवाईवेळी पोलिसांना दोन महिला आढळून आल्या. या त्रस्त महिलांची सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. टिळकवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

Related Stories

युवा कार्यकर्त्यांतर्फे शंकरगौडा पाटील यांचा सत्कार

Patil_p

‘ब्लड ऑन कॉल’ योजना सुरू करणे आवश्यक

Amit Kulkarni

शहरात पाणीटंचाईची शक्यता

Amit Kulkarni

भारत बंदला कुडचीत उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

ब्रह्मलिंग हायस्कूलतर्फे रामू गुगवाड यांचा सत्कार

Omkar B

हिंदवी स्वराज युवा संघटनेतर्फे वृक्षारोपण

Amit Kulkarni
error: Content is protected !!