Tarun Bharat

खानापूर शहर-तालुक्यात दीपावली उत्साहात साजरी

विविध मंदिरांसह घरोघरी विद्युत रोषणाई : पाडव्यानिमित्त गवळी बांधवांकडून म्हशींची सवाद्य मिरवणूक, विविध स्पर्धांचे आयोजन

प्रतिनिधी /खानापूर

खानापूर शहर परिसरात दीपावली मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त घरोघरी तसेच अनेक मंदिरात बुधवार दि. 3 रोजीपासून दीपप्रज्वलित करण्यात आले. तर अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली. गुरुवार दि. 4 रोजी पहाटे अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून दीपावलीचे स्वागत करण्यात आले. शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर रांगोळय़ा घालण्यात आल्या होत्या. पहाटेपासूनच एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

सकाळपासून शहरातील विठ्ठल मंदिर, ग्रामदेवता रवळनाथ मंदिर, लक्ष्मी मंदिर, चौराशी मंदिर तसेच सातेरी माउली मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दीपावलीनिमित्त शहरात अनेक ठिकाणी लहान मुलांनी शिवकालीन किल्ले बनविले आहेत. त्या किल्ल्यांचा उद्घाटन सोहळा गुरुवारी झाला. किल्ले पाहण्यासाठी पहिल्या दिवशीपासूनच गर्दी होत आहे. यावेळी दीपावली दिवशीच अमावास्या आल्याने अनेक व्यावसायिकांनी लक्ष्मीपूजनाचा सोहळाही साजरा केला. शहरातील अनेक व्यावसायिकांनी लक्ष्मीपूजनाची तयारीही जोरदार केली होती. अनेक दुकानदारांनी बुधवारपासून विद्युतरोषणाई केली होती. काहींनी शुक्रवारीही लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम साजरा केला.

तालुक्याच्या ग्रामीण भागातही दीपावलीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. वास्तविक सध्या भातकापणीचा हंगाम सुरू आहे. पण त्यातच वेळ काढून ग्रामीण भागात दीपावली उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच युवापिढीने ऐतिहासिक किल्ले करण्यावर विशेष भर दिला आहे. याशिवाय अनेक गावांमध्ये दीपावलीनिमित्त विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्यांने माणसाने गाडी ओढणे, बैलगाडी शर्यत, कबड्डी स्पर्धा, नृत्य, रांगोळी तसेच क्रिकेट स्पर्धा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

Related Stories

मण्णिकेरी येथील ‘त्या’ जवानावर आज अंत्यसंस्कार

Patil_p

‘बिम्स’ला 50 लाख अतिरिक्त अनुदान द्या

Amit Kulkarni

कोरोनाच्या तपासणीसाठी धावणार मोबाईल बस

Patil_p

सतरा रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा

Omkar B

जिल्हा पोलीस प्रमुखांचा आज फोन ईन कार्यक्रम

Amit Kulkarni

बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात धावतात 6 लाख वाहने

Amit Kulkarni