Tarun Bharat

खानापूर शहर परिसरात तुळशी विवाह मंगलमय वातावरणात

प्रतिनिधी/ खानापूर

ऊसाचे मंडप, श्रीकृष्णाची मुर्ती, रंगीबेरंगी फुलांच्या माळा, नवरीप्रमाणे साज श्रृंगार केलेली तुळशी माता, हिरवा चुडा, अंतरपाठ, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी व लग्नाचे विधीवत मंत्र अशा मंगलमय वातावरणात  तुळशीचा विवाह सोहळा खानापूर शहर परिसरात अगदी उत्साहात साजरा झाला. कार्तिक द्वादशीपासून सुरू झालेल्या या तुळशी विवाहाची सांगता आज होणार असल्याने अनेकांच्या घरी आज तुळशी विवाहाबरोबरच लक्ष्मीपूजन देखील करण्यात येणार आहे. यामुळे सकाळपासूनच बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी जमू लागली आहे. 

सलग पाच दिवस आपापल्या सोयीनुसार तालुक्यातील प्रत्येकाने तुळशी विवाह अगदी आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला. अंगणातील तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी करण्याबरोबरच दारात सुंदर अशा रांगोळय़ा रेखाटण्यात आल्या होत्या. विवाहाच्या विधीसाठी आवळे व चिंचांची आरास घालण्यात आली होती. काही ठिकाणी तर चक्क आवळा आणि चिंचेपासून तुळशी वृंदावन सजविण्यात आले होते. दारी आंब्याचे तोरण सजले होते. विवाहासाठी शेजारापाजाऱयांची ये-जा सुरू होती. घराघरात पाच पक्वान्नांचा बेत आखण्यात आला होता. महिलावर्गाकडून ओटी भरणीचा कार्यक्रम करण्यात आला. सगळी विधिवत पुजा झाल्यानंतर स्वस्तीश्री गणनायकम् गजमुखम…. च्या गजरात तुळशी माता आणि श्रीकृष्णाच्या मुर्तीवर अक्षतांचा वर्षाव करण्यात आला. अशाप्रकारे मंगलमय व उत्साही वातावरणात तुळशी विवाह शहर परिसरात पार पडला. लहान मुले तर अगदी आनंदाने या विवाहात सामील झाली होती.

Related Stories

कोमलण्णा दोड्डाणावर यांचे शैक्षणिक कार्य अविस्मरणीय

Amit Kulkarni

परीक्षेच्या भितीने विद्यार्थिनीची आत्महत्या

Tousif Mujawar

खानापूर-बेळगाव मित्रमंडळाचा पुण्यात स्नेहमेळावा

Amit Kulkarni

कुमारस्वामी लेआऊटमधील भूखंडांची होणार विक्री

Patil_p

झुंजवाड येथे ट्रक्टरखाली सापडून शेतकऱयाचा मृत्यू

Amit Kulkarni

कर्नाटक : कोडगू आणि एचडी कोटे येथील पर्यटकांच्या मुक्कामावरील बंदी उठली

Archana Banage