Tarun Bharat

खालच्या पातळीचं राजकारण ठाकरे-पवारच करु शकतात – किरीट सोमय्या

ऑनलाईन टीम / नवी मुंबई


गेले काही दिवस भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसमधील अनेक नेत्यांचा समावेश असुन या आरोपासंबंधीत कागपत्रे ही त्यांनी इडीला सादर केली आहेत. गेल्या दोन दिवसात ही त्यांनी दिपावलीनंतर आणखी फटाके फोडणार असल्याचे वक्तव्य करत काही नेत्यांनी भ्रष्टाचार केला आहे. याबद्दल आणखी घोटाळे बाहेर काढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभुमीवर त्यांनी महाविकास आघाडी सरकारला निशाणा करत खालच्या पातळीचं राजकारण ठाकरे-पवारच करु शकतात असे म्हटले असुन आरोपांची मालिका अद्याप सुरुच आहे.

यावेळी सोमय्या यांनी बोलताना दिवाळीनंतर आपण सरकारमधल्या तीन मंत्र्यांची आणि तीन जावयांची पोलखोल करणार असंही सांगितलं. तसेच अमृता फडणवीसांवर नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. ती कॅपेसिटी नवाब मलिकांची नाही, अशी खोचक टिप्पणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही भ्रष्टाचार केला असुन त्यांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नालगांच्या नावावर केली आहे. असा ही आरोप त्यांनी यावेळी केला.

तसेच समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका करण्याइतकं गलिच्छ राजकारण केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात. असा ही टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. त्यामुळे आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सोमय्यांनी आता शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादीचे नेते हे प्रकरण नेमके कसे हाताळतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

लोकशाही निर्देशांकात भारताचे स्थान घसरले

Patil_p

चंदुकाका सराफ दुकानात 79 लाखांच्या दागिन्यांचा अपहार

datta jadhav

रेल्वे इंजिनियरने विकले वाफेचे इंजिन

Patil_p

अमरनाथ यात्रेवर शस्त्रात्रांच्या तस्करीचे संकट

Kalyani Amanagi

देवेंद्र फडणवीस 10-20 पवार खिशात घालून फिरतात

datta jadhav

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 भाविकांचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!