Tarun Bharat

‘खाली झोली, खाली थाली.. कैसे मनेगी हामारी दिवाली’

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली मातीच्या लाडूने दिवाळी

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर 

खाली झोली, खाली थाली.. कैसे मनेगी हामारी दिवाली ही वास्तविक दाहकता आहे गरीब कष्टकाऱ्यांची. कोरोनाच्या प्रादुर्भावाने अर्थचक्र मंदावले, टाळेबंदीने हातातले काम हिरावून घेतले, सरकारला रोजीरोटी विचारले असता रिकाम्या पोटी आत्मनिर्भर होण्याचा फुकटचा सल्ला दिला. सरकारला बुडवणाऱ्या धनदांडग्यांच्या आणि भांडवलदाराची खरी दिवाळी होईल पण सरकारला कर अदा करणाऱ्या सर्वसामान्य गरिबांची दिवाळी होणार ? असा प्रश्न उपस्थित करत अखिल भारतीय महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा माजी नगरसेविका कॉ. नसीमा शेख यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

ऐन सणासुदीला कामगारांना बोनस नाही, हक्क रजा नाही, विडी कामगारांना मदत म्हणून दिलेली रक्कम बळजबरीने कपात केले. आता माती खाण्याशिवाय पर्याय नाही म्हणून मातीचे प्रतिकात्मक लाडू बनवून वाटप करून सरकारचा जोरदार निषेध करत माजी नगरसेविका कॉ.नसीमा शेख यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

अखिल भारतीय जनावादी महिला संघटनेच्या वतीने सरकारच्या कामगार- कर्मचारी विरोधी धोरणांमुळे दिवाळी कशी साजरी करायची अशी दुर्दैवी वेळ आली आहे. म्हणून मातीचे प्रतिकात्मक लाडू बनवून सरकार विरुध्द राज्यव्यापी निषेध करण्यात आला. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा समितीच्यावतीने नसीमा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा अध्यक्षा माजी नगरसेविका शेवंताताई देशमुख व जिल्हा सचिवा शकुंतला पाणिभाते यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मध्यवर्ती भागात दत्त नगर, भगवान नगर, राहुल गांधी झोपडपट्टी, जंगम वस्ती, गांधी नगर, स्वागत नगर समाधान नगर सुनील नगर आदी ठिकाणी काळी दिवाळी साजरी करण्यात आली.

यावेळी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, अंबुबाई पाथरुट, पुष्पा स्वामी, जलालबी शेख, सावित्रा गुंडला, राशिदा शेख,महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.

Related Stories

खुल्या वर्गातील एसीईबीसी ५० टक्के फी माफी जी.आर.ची अंमलबजावणी करा

Archana Banage

पंढरपूरचे सुपूञ नितीन खाडेंची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

Archana Banage

आठ हजाराची लाच स्विकारताना दुय्यम निरीक्षकासह जवान अटकेत

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये ३४२, तर शहरात ४४ जण कोरोनाबाधित

Archana Banage

सोलापूर : ऑनलाईन शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत,वाढ कि अभाव

Archana Banage

माकपच्या आंदोलकांना पोलिसांनी नेले फरफटत

Archana Banage