Tarun Bharat

खासगी रुग्णालयांनी बेड संदर्भात सूचनांचे पालन न केल्यास बाह्यरुग्ण विभाग बंद करण्याचा इशारा

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. दरम्यान कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सरकारकच्या बेड्स बेड वाटपाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयांचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद करण्याचा इशारा महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिला आहे.

शनिवारी खासगी रुग्णालय व्यवस्थापनांशी भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना जर खासगी रुग्णालये सरकारने घालून दिलेल्या नियमांच्या आधारे बेड उपलब्ध करून देत नसतील तर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

राज्यात अशी काही प्रकरणे आढळली आहेत ज्यातून डिस्चार्जनंतरही रूग्णाला रुग्णालयात दाखल केले गेले आहे. रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालये नवीन रूग्णांची भरती करत आहेत आणि असे केल्याने शासनाने संदर्भित केलेल्या रुग्णांना बेड मिळत नाहीत.
मंत्री अशोक म्हणाले की, बेडच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी आता आयएएस अधिकारी तुषार गिरीनाथ हे असतील आणि बीबीएमपीच्या हद्दीत एकात्मिक बेड वाटपासाठी त्यांची मुख्य नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारवरील आरोप खरे नाहीत
एका प्रश्नाला उत्तर देताना आर. अशोक यांनी राज्यात लस नसल्याबद्दल केंद्र सरकारला दोष देता येणार नाही, कारण केवळ लस उत्पादक कंपन्या लस पुरवण्यास असमर्थ आहेत, असे ते म्हणाले. अशोक यांनी केंद्राची बाजू घेत लस उत्पादकांना दोष दिला आहे.

Related Stories

कोडोलीत तरूणाची आत्महत्या

Abhijeet Khandekar

डॉ. डी. वाय. पाटील यांना प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार

Abhijeet Khandekar

राऊतांना अद्याप राज्याचे मुख्यमंत्री माहिती नाहीत : राणे

Archana Banage

अग्नितांडव ; दोन दुकाने जळून खाक ; लाखोंचे नुकसान

Anuja Kudatarkar

कर्नाटकात सप्टेंबरमध्ये विक्रमी लसीकरण

Archana Banage

देशाची घटना-सार्वभौमत्व धोक्यात – दिग्विजय सिंह

Archana Banage