Tarun Bharat

खासगी सावकारांच्या मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिह्यातील अवैध सावकारी व्यवसाय करणाऱयाविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी जिल्हा पोलीस पोलीस दलाला दिले होते. या निर्देशानुसार विशेष मोहिम राबवत सावकारांच्या त्रासाला कंटाळलेल्या पिडितांच्या तक्रारी घेऊन जिल्हय़ातील विविध ठिकाणच्या 15 सावकारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सावकारांना नोटीस बजावल्या असून कायदेशीर पोलीस प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांच्या खासगी सावकारांच्या विरोधात सुरू झालेल्या मोहिमेमुळे खासगी सावकरांचे धाबे दणाणले आहे.

  सातारा शहरासह जिह्यात अवैध सावकारी व्यवसाय गेल्या काही दिवसांपासून तेजीत सुरू होता. या त्रासाला कंटाळूनही पिडित तक्रार दाखल करायला घाबरत होते. परंतु संबंधित पिडित व्यक्तीला योग्य न्याय मिळेल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिल्याने अनेक पिडित व्यक्तींनी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. या गुह्याच्या आधारे जिल्हा पोलीस दलातर्फे दि. 22 ते 28 जानेवारी या 7 दिवसात अवैध सावकारी व्यवसाय करणाऱया सावकाराविरूद्ध विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत शिरवळ, उंब्रज, कराड शहर, सातारा शहर, फलटण ग्रामीण, पाटण, वाई, शाहूपुरी, कोरेगाव, वडुज, मेढा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावकारांच्या त्रासाला कंटाळलेल्या पिडितांच्या तप्रारी घेऊन एकूण 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  अवैध सावकारांच्या कारवाईची मोहिम यापुढे अशीच सुरू राहणार आहे. नागरिकांनी बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱयांकडून त्रास होत आहे. अशा तक्रारदारांनी संबंधित पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करावी जेणेकरून अवैध सावकारी व्यवसायाचे समुळ उच्चाटन करता येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक बन्सल यांनी केले आहे.

Related Stories

सज्जनगडावर दासनवमीनिमित्त विविध कार्यक्रम

Patil_p

शरद पवारांच्या गोविंद बाग निवासस्थानी सुरक्षा वाढवली

Archana Banage

शनिवारी दिवसभरात राज्यातील ८,२६८ ग्राहकांना घरपोच मद्यपुरवठा

Archana Banage

संचारबंदीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना सुविधा पुरविण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त

Archana Banage

‌उच्च न्यायालयाची बंदी झुगारत येरळा नदीपात्रातील वाळू उपसा सुरुच

Archana Banage

दिवाळीनंतर 3 मंत्री आणि त्यांच्या जावयांचे फटाके फोडणार

datta jadhav