Tarun Bharat

खासगी सावकार धुमाळ टोळी सांगली जिल्ह्यातून तडीपार

प्रतिनिधी / मिरज

खासगी सावकारी, मालमत्ता बळकावणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे अशी अनेक गुन्हे दाखल असलेल्या तालुक्यातील म्हैसाळ येथील खासगी सावकार शैलेश धुमाळ टोळीला सांगली जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी मंगळवारी ही कारवाई केली. या कारवाईमुळे अन्य खासगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

खासगी सावकार शैलेश रामचंद्र धुमाळ (वय ५५), अशिष शैलेश धुमाळ (वय ३०) या पिता पुत्रासह जावेद बंडु कागवाडे (वय ३५), अमोल आनंदा सुतार (वय ३५), सुरेश हरी शिंदे (वय ५६) आणि बाबासो बापु हेरवाडे (वय ६३, सर्व रा. म्हैशाळ) या टोळीवर एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीला सांगली जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत.

Related Stories

मिरजेत मराठी रंगभूमी दिन साजरा

Archana Banage

कडकडीत बंद, भव्य मोर्चा

Archana Banage

Kolhapur; साडीने गळा आवळून खून; अंगावरिल दागिने घेऊन चोरट्यांचं पलायन

Abhijeet Khandekar

सांगली : तासगाव शहरात वाहतूक नियमन

Archana Banage

भाटशिरगाव येथे तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

Archana Banage

मिरजेत उभारणार अत्याधुनिक फायर स्टेशन

Archana Banage