Tarun Bharat

खासदार उदयनराजेंची ती एन्ट्री वाऱयावरची वरात होती

आमदार शिवेंद्रराजेंनी साधला निशाणा

प्रतिनिधी/ सातारा

परवाच्या दिवशी आपण काही काही स्टँट बघितले. त्यांच्याप्रमाणेच सारी वाऱयावरची वरात होती. मोटरसायकल वाऱयावरनच आली अन् खाली उतरली. खाली उतरायला काही नाही पण त्यांचे सगळे कामच वाऱयावरचे आहे. जमिनीला धरुन काही नसते, असा निशाणा खासदार उदयनराजें यांच्यावर नाव न घेता आमदार शिवेंद्रराजेंनी लगावला. ते नगरसेवक अविनाश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

 मंगळवार तळे येथे नगरसेवक अविनाश कदम यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रवी ढोणे, नगरसेवक धनंजय जांभळे, अमोल मोहिते, भालचंद्र निकम, रवी पवार, प्रकाश गवळी, माजी नगराध्यक्ष सचिन सारस, पप्पू लेवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, नगरसेवक अविनाश कदम यांचे काम चांगले आहे. त्यांना वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा आहेत. परवा आपण बरेच स्टँट पाहिले असतील. त्यांच्याप्रमाणेच सारी वाऱयावरची वरात होती. त्यांची कामे बघा ना सगळी वाऱयावरच असतात. जमिनीला धरुन काही नसतात. माझे खोटे असेल तर पहा. त्यांचे जे काय असेल ते वरुनच असते. स्वतःच्या कामाप्रमाणे ते हवेतून आले, अशा शब्दात आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंचा खरपूस समाचार घेतला.

  अविनाश कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी लोटला जनसागर

मंगळवार तळे येथे सांयकाळी नगरसेवक अविनाश कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शहरातून अनेक कार्यकर्ते, त्याचे चाहते शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम देण्यासाठी हजर झाले होते. जनसागर लोटला होता.

Related Stories

माजी नगरसेवक रामभाऊ रैनाक यांचे निधन

Patil_p

कोरोनाला हरवायचे आहे..व्यापाऱ्यांना नाही, वाईतील व्यापाऱ्यांचे मुक आंदोलन

Archana Banage

हनीट्रपप्रकरणी सातारा जिल्हय़ातील चौघे जेरबंद

Patil_p

कोयना धरणात १०५.०५ टीएमसी पाण्याची आवक

Archana Banage

खांबाटकीत वाहतूक संथ गतीने

Patil_p

कुस्तीगीर परिषदेच्यावतीने प्रशिक्षकांना ऑनलाईन वेबीनार सुरू होणार

Archana Banage