Tarun Bharat

खासदार उदयनराजे यांची केंद्रीय आरोग्य मंत्रांशी चर्चा

दिल्लीत घेतली भेट – शासकीय मेडिकल कॉलेजबाबत केली चर्चा

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हय़ात होवू घातलेल्या शासकीय मेडिकल कॉलेज पूर्णत्वासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी चांगलाच पुढाकार घेतला असून या मेडिकल कॉलेजसाठी त्यांनी दिल्लीत थेट केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेत साताऱयातील मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढीव जागांना परवानगी देण्याची मागणी केली.

मंगळवारी नवी दिल्ली येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली.

या भेटीत खासदार उदयनराजे भोसले डॉ. हर्षवर्धन यांच्यात सातारा येथील प्रस्तावित शासकीय मेडिकल कॉलेज संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. सातारा शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रक्रियेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहभाग घ्यावा व कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त वाढीव जागांना आपणाकडून परवानगी मिळावी, अशी मागणी खासदार उदयनराजेंनी या चर्चेवेळी मांडली. त्याला डॉ. हर्षवर्धन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, सातारा जिल्हय़ात शासकीय मेडिकल कॉलेजवरुन राजकारणाचा थोडाफार धुरळा उडत असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी या मेडिकल कॉलेजचे काम तातडीने मार्गी लागावे म्हणून थेट दिल्लीला धडक मारली असून यासंदर्भात त्यांचा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासमवेत फोटो सोशल मिडियावर झळकत होता व त्यावर प्रतिक्रिया देत जिल्हय़ातील तरुणाईंनी खासदार उदयनराजेंना चांगला प्रतिसादही दिला आहे.

Related Stories

परप्रांतीय मुकेशचा आणखी एक कारनामा समोर

Patil_p

हे अमृतकाळातील नव्हे तर मित्र काळातील बजेट- राहुल गांधी

Abhijeet Khandekar

…म्हणून राजकारणात येणं राहून गेलं; सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

Abhijeet Khandekar

ताथवडा घाटात जबरी चोरी

Patil_p

”मोदी तुमचे अश्रू कोरोना मृतांचे जीव वाचवू शकत नाहीत”

Archana Banage

आरटीईअंतर्गत गतवर्षीपेक्षा 80 हजारांनी अर्जसंख्येत वाढ

datta jadhav