Tarun Bharat

खासदार ओमराजेंचा बार्शी दौरा, कोरोना बाधित 19 गावांना भेटी

बार्शी / प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यांसह बार्शी तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर हे मतदारसंघात दौरे करत उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यानंतर ओमराजेंनी बार्शीवर विशेष प्रेम दाखवलंय. बार्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील, कोरोनाबाधित गावांना ते भेटी देत आहेत. गाव खेड्यातही ते आवर्जून भेट देतात.

कोरोनाने विळखा घातलेल्या बार्शी तालुक्याचा आढावा घेण्यासाठी आज तालुक्यातील चारे, चुंब, आगळगाव, भोईरे, गातचीवाडी, धामणगाव, आरणगाव, धोत्रे, खामगाव, पानगाव,माणेगाव,सासुरे,राळेरास, शेळगाव, सर्जापुर,इरले, सुरडी, गुळपोळी यासह अनेक गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने गावास भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला, यावेळी गावातील नागरिकांशी चर्चा केली.

कंटेनमेंट भागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रशासकीय यंत्रणेस ओमराजेंकडून देण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण काकडे, तहसीलदार संजय मुंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.जे.बुवा, सपोनि , ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, पोलिस पाटील आशा कर्मचारी, ग्रा.प.कर्मचारी आदी संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी जि.प.सदस्य किरण मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविन काकडे, उपतालुकप्रमुख राजकुमार पाटील, पांडुरंग गपाठ, विभाग प्रमुख नितीन मोहळे, अमोल करंडे, पोपट मूटकुळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

”फडणवीस बोलतात त्यात तथ्य नाही, भास्कररावांनी घडलेलं रेकॉर्डवर आणलंय”

Archana Banage

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही – देवेंद्र फडणवीस

Archana Banage

लॉक डाऊनमध्ये दारुच्या दुकानांना मुभा देणे चुकीचे

Tousif Mujawar

मुलाच्या बेदम मारहाणीत पित्याचा मृत्यू

Archana Banage

महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 12 लाखांच्या उंबरठ्यावर

Tousif Mujawar

NDA मध्ये नोकरी, वर्क टेंडरच्या आमिषाने 28 लाखांचा गंडा

datta jadhav