Tarun Bharat

खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांना ‘युवक क्रांतीवीर’ पुरस्कार जाहीर

Advertisements

ऑनलाइन टीम  / पुणे :   

श्री पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकॅडमी या सामाजिक संस्थेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा ‘युवक क्रांतीवीर’ पुरस्कार लडाखचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांना ऍड. विद्यासागर डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते शनिवार दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी, संध्याकाळी 5.30 वाजता, श्री बंटारा भवन, बाणेर पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती अकॅडमीचे अध्यक्ष ऍड. राहुल संत यांनी पत्रकाद्वारे कळवली आहे. 
कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाचा पुरस्कार अखंड भारत या संकल्पाचे पुरस्कर्ते खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांना देण्यात येणार आहे. याआधी हा पुरस्कार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पुनम महाजन, युवा नेते आदित्य ठाकरे, जयकुमार रावल, आमदार विश्वजीत कदम यांना प्रदान करण्यात आला आहे. 
यावळी जीवनकला मंडळातर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा.सुभाषचंद्र प्रतापराव भोसले यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या जयंतीनिमित्त आणि सती मनकर्णिका माता पारनेरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिला जाणारा मातृधर्म पुरस्कार यावर्षी मंगला चंद्रशेखर इटकर यांना प्रदान करण्यात येणार आहे
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ उद्योजक नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया उपस्थित राहणार आहेत. तर आमदार चंद्रकांतदादा पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, अनंत ताकवले, प्रा. डॉ. संजय चोरडिया, प्रा. डॉ. दशरथ भोसले, लक्ष्मीकांतदादा पारनेरकर आणि सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

Related Stories

होम ऑफिसची वाढणार क्रेझ

Patil_p

4 पायांच्या प्राण्यांमध्ये चालते अनोखे कुटुंब

Patil_p

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून तुम्हीही होऊ शकता करोडपती

datta jadhav

नोएडा प्राधिकरणने सुरू केली ‘ऑक्सिजन बँक’

Rohan_P

कोरोनाविषयी जनजागृतीसाठी दत्तमंदिराचा पुढाकार

tarunbharat

‘इस्रो’ची गगनभेदी भरारी !

Patil_p
error: Content is protected !!