Tarun Bharat

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण


मुंबई \ ऑनलाईन टीम

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.

कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे., असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

Related Stories

भाजप आमदारांकडून सभागृहातच धमक्या ; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Archana Banage

शाहूपुरी पोलिसांकडून मोबाईल, दुचाकी चोरटयांची टोळी अटक

Archana Banage

नांदेडमध्ये २५ तलवारी जप्त; दोघेजण ताब्यात

Archana Banage

TET परीक्षेत गैरप्रकार, 9500 उमेदवारांवर कारवाई

datta jadhav

“मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक”

Archana Banage

वादळी वाऱयामुळे वर्धन ऍग्रोचे गोडावून भुईसपाट

Patil_p