Tarun Bharat

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांसह चौघांवर गुन्हा दाखल

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

माढा लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दिगंबर आगवणे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झालेला आहे. दिगंबर आगवणे यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. तर पोलीस ठाण्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे खासदार रणजितसिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  एकेकाळी सख्खे मित्र म्हणून फलटण तालुक्यातील ज्यांची ओळख होती ते दिगंबर आगवणे आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात आता वितुष्ट निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिगंबर आगवणे यांच्याकडून सातत्याने खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्यावर आरोप होऊ लागले होते. त्यांच्याकडून न्यायालयात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तरीही गुन्हा दाखल झाला नव्हता म्हणून आगवणे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार आयपीसी 406,405, 418, 420, 467,468नुसार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिजामाला नाईक निंबाळकर (रा.राजभवन फलटण), विनय श्रीकांत ठाकूर (रा.जाधववाडी), लतीफ उस्मान तांबोळी (रा.लक्ष्मीनगर फलटण) यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, फिर्याद पूर्णपणे इंग्रजीमध्ये आहे.

Related Stories

कोल्हापुरात कडकडीत लॉकडाऊन; पहा ही दृश्ये

Abhijeet Shinde

मार्च महिन्यात 7 हजारावर रूग्ण वाढले

Amit Kulkarni

एकाच रस्त्यावर डांबरीकरणाचा थाट

Patil_p

चोरून दारुविक्री करणारा जगन्नाथ पवार ताब्यात

Patil_p

ओढय़ात कार कोसळून कोल्हापूरचे दोघे ठार

Patil_p

आषाढी वारीचे नियोजन नेटकेपणाने करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!