Tarun Bharat

खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाई थांबवा

म. ए. युवा समितीतर्फे राष्ट्रपतींना निवेदन : सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप

प्रतिनिधी /बेळगाव

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सूडबुद्धीने ईडीमार्फत कारवाई करण्यात आली आहे. त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. तेव्हा त्याचा सीमाभागातील जनता तीव्र शब्दात निषेध करत आहे.

 त्यांच्यावरील कारवाई तातडीने थांबवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे राष्ट्रपतींच्या नावाने निवेदन देण्यात आले.

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, सुधा भातकांडे, प्रकाश शिरोळकर, दिलीप बैलूरकर, संजय शिंदे, राजू शहापूरकर, अरुण पोटे, शांताराम होसूरकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

मोफत धान्याच्या मुदतीत पुन्हा वाढ

Amit Kulkarni

अनगोळ मुख्य रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य

Amit Kulkarni

श्री तुळजा भवानी महिला मंडळाचे उद्घाटन

Amit Kulkarni

हलगा येथे पंचकल्याण महोत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ

Patil_p

दसरा ज्युडो स्पर्धेत बेळगाव डीवायईएस संघाला सर्वसाधारण विजेतेपद

Amit Kulkarni

सेंट पॉल्सचा पराभव करून कनक मेमोरियलची अंतिम फेरीत धडक

Amit Kulkarni