Tarun Bharat

खासबागच्या बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ

Advertisements

नागरिकांनी तरुणाला पकडून दिला चोप

प्रतिनिधी / बेळगाव

खासबाग येथे भरणाऱया आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी सकाळी भर बाजारात मोबाईल चोरणाऱया एका तरुणाला पकडून त्याला शहापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचा साथीदार फरारी झाला आहे.

रविवारी सकाळी 11 च्या सुमारास बाजारासाठी आलेल्या एका इसमाचा मोबाईल पळवताना नागरिकांनी पाठलाग करून मोबाईल चोराला पकडले. जमावाने त्याला चोप दिला असून पळताना पडून तो किरकोळ जखमी झाला आहे. त्याचा आणखी एक साथीदार मोबाईलसह फरारी आहे. या घटनेनंतर शहापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. नागरिकांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाला शहापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. यासंबंधी रविवारी रात्री शहापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता त्याच्यावर कारवाई केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

खानापुरातील ‘त्या’ मनोरुग्णाची कदंबा फाऊंडेशन सदस्यांनी घेतली दखल

Tousif Mujawar

पाणी गळतीमुळे अपघातात वाढ

Amit Kulkarni

मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकाऱयांची भेट

Amit Kulkarni

कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा आजपासून सुरू

Amit Kulkarni

महात्मा गांधी पुरस्कारासाठी ग्रा.पं.ची नावे सरकारकडे

Amit Kulkarni

घराचे छत कोसळून महिला ठार

Amit Kulkarni
error: Content is protected !!