Tarun Bharat

खासबाग कुस्ती मैदानासाठी निधी देणार

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांची ग्वाही; खासदार संभाजीराजेंनी घेतली भेट

कोल्हापूर प्रतिनिधी

राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या विकास आणि पुनरूज्जीवनासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधीची तरतूद केली जाईल, त्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव आणि आराखडा पाठवा, असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री ठाकुर यांची भेट घेऊन त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीसह क्रीडाविकासाठी संस्थान काळात केलेल्या कार्याची माहिती दिली. युरोपियन मैदानाच्या धर्तीवर शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी खासबाग कुस्ती मैदानाची उभारणी केली होती. या मैदानावर नामवंत मल्लांच्या हजारो कुस्त्या झाल्या. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून ओळख देण्याचे काम ज्या मल्लांनी केले, त्यांना उभारण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले. असंख्य मल्लांना राजाश्रय दिला. यासह कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेची माहिती संभाजीराजे यांनी मंत्री ठाकुर यांना दिली. येत्या 6 मे 1922 रोजी राजर्षी शाहू महाराजांची स्मृतीशताब्दी आहे. या निमित्ताने त्यांनी कुस्तीच्या वृद्धीसाठी उभे केलेल्या खासबाग कुस्ती मैदानाचे पुनरूज्जीवन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून भरीव निधी द्यावा, अशी मागणी यावेळी संभाजीराजे यांनी केली. या मागणीचे पत्रही त्यांना दिले.

मंत्री ठाकूर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत खासबाग कुस्ती मैदानाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सविस्तर आराखडा मागवून घेऊ व त्यानुसार आवश्यक तितक्या निधीची तरतूद करू, अशी ग्वाही संभाजीराजे यांना दिली.

प्रस्ताव पाठविण्याच्या राज्य क्रीडा खात्याला सूचना
याआधी मी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसाठी केंद्र शासनाकडून साडे पाच कोटी रूपये निधी आणला आहे. या निधीतून ऍस्ट्रोटर्फ बसविण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाने खासबाग मैदान बाबत देखील आवश्यक प्रस्ताव तातडीने दिल्यास, ’छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व’ निमित्त दोन्ही मैदानांच्या विकासकामांचे उद्घाटन एकत्रित करता येईल, असे मंत्री महोदयांनी सूचित केले आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने कार्यवाही करीत खासबाग मैदानाच्या विकास आराखडा व प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे सादर करावा, अशी सूचना आपण राज्याच्या क्रीडा खात्याकडे केली असल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितले.

Related Stories

एसटीची ठोकर बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार ; कोल्हापूर- गारगोटी रस्त्यावरील घटना

Abhijeet Khandekar

Kolhapur : अंबाबाई मंदिरात चोरी करणाऱ्या 2 महिला पोलिसांच्या ताब्यात, अवघ्या दहा मिनिटात लावला छडा

Archana Banage

देशात 1.17 लाख नवे बाधित

datta jadhav

शाहू समाधी स्थळ लोकार्पण सोहळा लोकोत्सव करुया

Archana Banage

”नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता”

Archana Banage

मराठा आरक्षणप्रश्नी सर्वांनी एकत्र यावे

Archana Banage
error: Content is protected !!