Tarun Bharat

खासबाग येथील गणेश मंदिरात चोरी

कुलूप तोडून दोन किलो चांदीची प्रभावळ लांबविल्याचे उघड

प्रतिनिधी / बेळगाव

संभाजी रोड, खासबाग येथील गणेश मंदिराच्या शटरचे कुलूप तोडून चोरटय़ांनी दोन किलो वजनाची चांदीची प्रभावळ चोरली आहे. गुरुवार दि. 17 मार्च रोजी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून रविवारी याप्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मंदिरातील चोरीच्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. यासंबंधी गणेश मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष सदाशिव ठकाप्पा माळवी यांनी रविवारी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

चोरटय़ांनी सव्वा लाख रुपये किमतीची दोन किलो चांदीची प्रभावळ पळविली असून शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत
आहेत.

नेहमीप्रमाणे बुधवार दि. 16 मार्च रोजी रात्री 8 वाजता मंदिराच्या शटरला कुलूप लावण्यात आले होते. दुसऱया दिवशी गुरुवारी सकाळी 7 वाजता पुजारी अनंत केरुर हे पूजेसाठी आले असता शटर उघडे होते. श्रीमूर्तीच्या पाठीमागील चांदीची प्रभावळ चोरीस गेल्याचे उघडकीस आले.

Related Stories

यशवंतपूर-बेळगाव-यशवंतपूर मार्गावर विशेष रेल्वे

Omkar B

रविवारी 601 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

वाडा कंपाऊंड, अनगोळमध्ये तिळगूळ समारंभ

Omkar B

येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा शुभम शेळके यांना पाठिंबा

Amit Kulkarni

एज्युकेशन इंडिया संस्थेतर्फे आहार किट वाटप

Amit Kulkarni

सीमोल्लंघनासाठी शहर देवस्थान कमिटीचा निर्णय मान्य राहील

Patil_p