Tarun Bharat

खासबाग येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

बसवाण गल्ली, खासबाग येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

मंजुनाथ नारायण मोदगी (वय 28) असे त्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. मंजुनाथ हा खानापूरला रहात होता. रोज बेळगावला येऊन गॅस सिलिंडर वितरणाचे काम करीत होता.

मंगळवारी रात्री खासबाग येथील आपल्या भावाच्या घरी तो झोपला होता. बुधवारी सायंकाळपर्यंत तो उठला नाही. म्हणून कुटुंबीयांनी बाहेरून दरवाजा ठोठावला. आतून कडी लावली होती. आतून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून पोलिसांसमक्ष दरवाजा तोडून पाहिले असता मंजुनाथने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Stories

शहर परिसरात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन

Omkar B

मद्यशौकिनांसाठी खुषखबर!

Patil_p

हलगा येथील तलावाचे लोकार्पण

Amit Kulkarni

सावळगी तालुका केंद्र करण्याची मागणी

Patil_p

पीटीएम कोल्हापूर, अलफते मुंबई, ग्लोबल केरळा उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

आई-वडील-शिक्षकांमुळे मिळाले यश

Patil_p
error: Content is protected !!