Tarun Bharat

खा. उदयनराजेंनी घेतली अजित पवारांची भेट; चर्चांना उधाण

ऑनलाईन टीम / पुणे :

भाजपचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. साताऱ्यातील विकास कामांच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र, अनेक दिवसानंतर या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने उदयनराजे राष्ट्रवादीत जातात की काय? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, साताऱ्यातील विकास कामांच्या अनुषंगाने आज अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत सातारा पालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागात रस्ते, लाईट, पथदिवे आणि ओपन स्पेस विकसित करण्यासाठी सुमारे 48.50 कोटींची गरज भासणार आहे. हे अनुदान राज्य शासनाने उपलब्ध करावे, अशी मागणी मी केली आहे. दरम्यान, तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उदयनराजेंनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रमाणं सर्वधर्म समभावाची संकल्पना मांडली, त्यानुसार माझी सर्व पक्ष समभाव अशी भूमिका आहे.

Related Stories

वीर धरण परिसरात गोळीबार; 9 अटकेत

datta jadhav

ठाकरे कुटुंबियांनी केले बाळासाहेबांना अभिवादन; मुख्यमंत्र्यांचेही अभिवादन

Abhijeet Khandekar

उंडाळकरांचा निर्णय खेदाचा पण व्यक्तिगत

Amit Kulkarni

लॉकडाऊनला 21 दिवस पूर्ण; बाधितांचा आकडा वाढताच

Amit Kulkarni

पुणे विभागातील 84, 602 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

केंद्राने गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंधावर आणली शिथिलता

Abhijeet Khandekar