Tarun Bharat

‘खिदमत ए खल्क’ने 25 फूट खोल खड्डयातून काढला मृतदेह

Advertisements

सातारा : क्षेत्रमाहुली येथे 52 वर्षाच्या इसमाने  25 ते 30 फूट खोल खड्डयालगत असलेल्या झाडाच्या मुळीला दोर बांधून गळफास घेतला होता. त्याच्या मृतदेह दोरी तुटून या खड्ड्यात पडला होता. संगमनगर पोलीस चौकीला याची माहिती मिळताच मंगळवारी रात्री 8 वाजनेचे सुमारास ‘खिदमत ए खल्क’ ग्रुपला यासंदर्भात फोन आला. या ग्रुपने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

गळफास घेतलेला व्यक्ती दोरी तुटून अंदाजे 25 ते 30 फुट खोल खड्ड्यात पडला होता. रात्री अंधार असल्याने एक जीप खड्डयालगत लावून त्याच्या उजेडात हा मृतदेह तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आला. खिदमत ए खल्क ग्रुपचे आसिफ खान, पिंटु शेठ सुतार, आसिफ फरास, आरीफ खान, हाफीज मुराद, अज्जु खान, व पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार या ग्रुपने तो म्रुतदेह काढुन सातारा येथे शासकीय रूग्णालयात पाठवला. 

Related Stories

सरकारी रक्तपेढी रक्तघटक मिळत नसल्याची तक्रार

Patil_p

कोरोनाच्या कारणास्तव सातारा पालिकेची सभा तहकुब

Amit Kulkarni

अज्ञात वाहनाच्या धडकेत लोणंद चा युवक ठार

Archana Banage

जावळी तालुक्यात तीन दिवसांत 160 जण कोरोना बाधित

Patil_p

कोमॉर्बिड सर्व्हेक्षणात कोरोना सदृष्य दीड हजार व्याधीग्रस्त आढळले

Amit Kulkarni

शिवतीर्थवरील मेघडंबरीच्या कामास सुरुवात

Patil_p
error: Content is protected !!