Tarun Bharat

खुनाच्या गुन्ह्यातील 11 वर्षापासून फरार आरोपीस अटक

Advertisements

सोलापूर जिल्हा सीआयडी पथकाची कामगिरी

सोलापूर 

मोहोळ पोलिस ठाण्यात अकरा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आली. सोलापूर विभाग गुन्हे अन्वेषण पथकाने आज ही कारवाई केली. आरोग्य तपासणीच्या बहाण्याने त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

जेवर हरिचंद्र काळे (रा. नरखेड ता. मोहोळ ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सन 2007 मध्ये मोहोळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी काळे हा घटनेपासून फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला. परंतु तो मिळून येत नव्हता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग सोलापूर कडे वर्ग करण्यात आला होता. 

दरम्यान, गुन्हे अन्वेषण  विभाग सोलापूर येथील पथकाला संशयित आरोपी काळे मोहोळ तालुक्यातील नरखेड गावाच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी पथकातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी नरखेड गाव तसेच परिसर पिंजून काढला. त्यावेळी त्यांना काळे हा परिसरात असल्याची खात्री झाली. परंतु अटक करण्यासाठी पोलीस आल्याची माहिती मिळाल्यास तो पळून जाण्याची शक्यता होती. यामुळे पथकातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी शक्कल लढवली. सध्या कोरोना महामारीचे संकट सुरू आहे, याच पार्श्वभूमीवर पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉक्टर तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे गणवेश परिधान करून आरोपी असलेल्या ठिकाणी धाव घेतली. 

आरोग्य तपासणीच्या बहाण्याने आरोपी काळे यास मोहोळ येथे आणण्यात आले . त्यानंतर त्यास मोहोळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी सोलापूर जिल्हा सीआयडी पथकातील पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम, पोलीस हवालदार शिवाजी अंकलगीकर, पोलीस हवालदार हाजीमलंग शेख यांनी केली.

Related Stories

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Archana Banage

फर्ग्युसन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

prashant_c

बिहार निवडणूक : बार्शीत काँग्रेसने केली ईव्हीएम मशीनला जिलेबी चक्र अर्पण

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यातील 94 टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन

Archana Banage

सोलापुरात तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थ विक्रीस नियम-अटींसह परवानगी

Archana Banage

राजकारणापेक्षा समाजकारणाचं ध्येय बाळगू – प्रा. शिवाजीराव सावंत

Archana Banage
error: Content is protected !!