Tarun Bharat

खुन्नस देण्यावरून युवकाचा खून

ओगलेवाडीत चाकूने भोसकले, दोन अल्पवयीन मुलांसह सहा जण ताब्यात

प्रतिनिधी/ कराड

एकमेकाला खुन्नस देण्यावरून ओगलेवाडी (ता. कराड) येथे 22 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. नरेंद्र अनिल कदम (वय 22, रा. एमएसईबी कॉलनी, ओगलेवाडी-हजारमाची, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकूण सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भररस्त्यात झालेल्या खुनामुळे ओगलेवाडीसह परिसरात खळबळ उडाली.

कुणाल सुभाष पळसे (वय 21), शुभम शैलेंद्र आंबेकर (वय 19), सागर पळसे (वय 25) व सचिन पळसे (वय 42, सर्व रा. ओगलेवाडी, ता. कराड) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांना 26 जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

  खूनप्रकरणी ऋषिकेश सुभाष पिसाळ याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी युवकांची धरपकड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नरेंद्र कदम हा ओगलेवाडी-हजारमाची येथे आई, भाऊ विरेंद्र, आजी आणि चुलत्यांसह रहात होता. 25 जानेवारी 2020 रोजी नरेंद्र मित्रासमवेत हजारमाची येथे बोलत उभा राहिला होता. त्याने नवीन ऍक्टिव्हा दुचाकी घेतली होती. ऍक्टिव्हाच्या नंबरप्लेट शोरूममधून आणायच्या असल्याने नरेंद्र निघाला होता. त्याचवेळी नरेंद्रच्या शेजारी राहणारा ऋषिकेश पिसाळ हा जीमला जाताना दिसला. नरेंद्रने त्याला नंबरप्लेट आणण्यासाठी कराडला जायचे आहे, असे सांगितले. ते दोघे ऍक्टिव्हा दुचाकीवरून हजारमाचीतून पळसेवाडय़ाकडून निघाले होते. तेथे रस्त्यावर एक युवक उभा होता. त्या युवकाकडे पाहून नरेंद्र ऋषिकेशला म्हणाला, की ‘हा माझ्याकडे नेहमी खुन्नसने बघतो’. याची विचारणा करण्यासाठी नरेंद्र गाडीवरून युवकाकडे गेला. ‘माझ्याकडे खुन्नसने का बघतोस?’ अशी विचारणा नरेंद्रने त्याला केली. त्या दोघांचे बोलणे सुरू असताना आसपास बसलेली मुले तेथे जमा झाली. त्यापैकी काहींच्या हातात दांडकी होती. दांडकी घेऊन आलेल्या युवकांना ऋषिकेशने आम्ही शांततेत बोलत असल्याचे सांगितले. मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

दरम्यान, कुणाल पळसे हा दांडके घेऊन नरेंद्रच्या अंगावर गेला. ऋषिकेशने कुणालला अडवले. हा प्रकार सुरू असताना सचिन पळसे, सागर पळसे यांच्यासह आणखी अनोळखी मुले जमा झाल़ी त्या सर्वांच्या हातात लाकडी दांडकी होती. गोंधळ सुरू असताना कुणाल पळसे याने लाकडी दांडके नरेंद्रला मारण्यासाठी उगारले, तेव्हा नरेंद्रने हातात पकडून हिसकावून घेत पुन्हा तसेच कुणालच्या पाठीत मारले. त्यामुळे चिडलेला कुणाल घराकडे पळत गेला. त्याने घरातून धारदार चाकू आणला व चाकूने नरेंद्रवर वार करण्यास सुरुवात केली. नरेंद्रच्या पोटात, छातीत चाकू भोसकल्याने तो रक्ताच्या थारोळय़ात पडला. नरेंद्र जोरजोरात ओरडू लागला. त्यावेळी सचिन पळसे, सागर पळसे यांच्यासह अन्य मुले तेथून पसार झाली.

भांडणाचा प्रकार पाहून सोनू उर्फ रोहित हाके, बंटी उर्फ आकाश मोरे, संकेत मोहिते तेथे आले. त्यांनी नरेंद्रला कॉटेज हॉस्पिटल येथे आणले. नरेंद्रवर उपचार सुरू होण्यापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले.

पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक सराटे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून संशयित युवकांची धरपकड सुरू केली. या प्रकाराने ओगलेवाडी परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Related Stories

रशियाची भारतावर मात

Patil_p

ऍडलेडच्या कसोटीला कोरोनाची बाधा

Patil_p

न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनव्हे फायनलमधून बाहेर

Patil_p

दबंग दिल्ली, पुणे पलटन, तामिळ थलैवाज विजयी

Patil_p

व्हेरेव्ह-बेरेटेनी यांच्यात जेतेपदासाठी लढत

Patil_p

लीसेस्टर सिटीकडे पहिल्यांदाच एफए चषक

Patil_p