Tarun Bharat

खुषखबर, एका दिवशी 705 रुग्ण कोरोनामुक्त

रुग्ण बरे होण्याचा एका दिवसातील सर्वाधिक आकडा, देशात 18 हजार 601 पैकी 3 हजार 252 रुग्ण पूर्ण बरे

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याचे चित्र असताना मंगळवारी कोरोनावर एकाच दिवशी 705 भारतीयांनी मात केल्याचे स्पष्ट झाले. या दिलासादायक वृत्तामुळे गेले अनेक दिवस आजाराबद्दलाचा नागरिकांमध्ये झालेल्या भीतीचा प्रादुर्भावही कमी होण्यास मदत होणार आहे.

देशात 18 हजार 601 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील 590 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 252 रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत. सोमवार 20 एप्रिल रोजी एकाच दिवशी देशात 705 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली. रुग्ण बरे होण्याची ही आजवरची एका दिवसातील सर्वात मोठी संख्या ठरली आहे.

राज्यांचा विचार करता महाराष्ट्रात रुग्णसंख्या अधिक असली तरी रुग्ण बरे होण्याची संख्या देखील अधिक आहे. राज्यातील 572 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यनिहाय कंसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे : केरळ (291)  तामिळनाडू (457), बिहार (41), उत्तर प्रदेश (140), राजस्थान (205), तेलंगणा (190), मध्य प्रदेश (127), गुजरात (131) आणि हरियाणा (127).

  ( एप्रिल)  दिनांक                रुग्ण बरे झाल्याची संख्या

       15                              183

 16                            260

17                             243

18                              239

19                                316

20                                 705

Related Stories

किरकोळ महागाई दर फेब्रुवारीत 6.44 टक्के

Patil_p

राहुलनी चिदंबरम यांची शिकवणी लावावी

Patil_p

हमीद अन्सारींवर भाजपचा हल्लाबोल

Patil_p

‘चक्का जाम’ दरम्यान अत्यावश्यक सेवांना रोखले जाणार नाही…

datta jadhav

जगभरातील 74 हजार कोरोना संक्रमित झाले ठणठणीत बरे

tarunbharat

अमरनाथ यात्रा 30 जूनपासून

Patil_p