Tarun Bharat

खूनप्रकरणी आणखी पाच जणांना अटक

मारिहाळ पोलिसांची कारवाई : फरारी आरोपींचा शोध जारी

प्रतिनिधी /बेळगाव

गेल्या आठ दिवसांपूर्वी करडीगुद्दीजवळ मुदकाप्पा चंद्राप्पा अंगडी (वय 25, रा. सुनकुप्पी, ता. बैलहोंगल) या तरुणाचा भीषण खून करण्यात आला होता. क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली होती. याप्रकरणी मारिहाळ पोलिसांनी गुरुवारी रात्री आणखी पाच जणांना अटक केली आहे.

क्षुल्लक कारणावरून तलवार हल्ला व दोन गटांत तुंबळ हाणामारीची घटना घडली होती. या घटनेत सातजण जखमी झाले होते. पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली असून याप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 9 वर पोहोचली आहे. एकूण 13 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन उमेश सीतीमनी, संतोष नाईक (दोघेही रा. मारिहाळ), कार्तिक पुजेर (रा. सुळेभावी), संजू विठ्ठल अरबळ्ळी (रा. करडीगुद्दी), विशाल मारुती बागडी (रा. मारिहाळ) अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

यापूर्वी दोड्डाप्पा गंपाप्पा अरबळ्ळी (रा. करडीगुद्दी), लक्काप्पा बसाप्पा हळ्ळी (रा. मारिहाळ), भरमोजी गंगाप्पा अरबळ्ळी, बसवंत बसवाणी करविनकोप्प (दोघेही रा. करडीगुद्दी) यांना अटक केली होती. खूनप्रकरणातील आणखी चौघे जण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मारिहाळचे पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

अत्यंत क्षुल्लक कारणावरून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. कॅम्बेल स्टोअरसमोर नागेश नामक एक मित्र मुदकाप्पा अंगडीला भेटला. मित्रासमवेत बोलत असताना एका मद्यपीने बोलेरोची काच फोडली. त्याला जाब विचारल्यामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तलवार, विळा आदी शस्त्रांचा वापर करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक केली आहे.

Related Stories

एक्सेस इलाईट, आनंद अकादमी ड्रॉपइन वॉरियर्स संघ विजयी

Patil_p

निपाणी ग्रामीण पोलीस स्थानक ठरले राज्यात सर्वोत्तम

Patil_p

व्हीटीयूमध्ये नूतन अभ्यासक्रमांचा शुभारंभ

Patil_p

हिंदुंच्या संरक्षणासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलावे

Amit Kulkarni

शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी

Patil_p

गोकाक, अरभांवी मतदार संघामध्ये भाजपचे शक्ती प्रदर्शन

Patil_p