Tarun Bharat

खूनाची धमकी देणाऱया खंडणीबहाद्दरास अटक

प्रतिनिधी/ सातारा

येथील बबल्स परमीट रुम ऍण्ड बारमध्ये दारु पिण्यास आलेल्या नितीन पांडुरंग सोडमिसे (रा. 32 ब रविवार पेठ, सातारा) याने दारुचे 520 रुपये बिल देण्यास नकार देत बार चालक प्रकाश मारुती खरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर मला दररोज 800 रुपये हप्ता द्यायचा, असा दम ही दिल्याची फिर्याद प्रकाश खरात यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरुन बारमध्ये धिंगाणा घालणाऱया नितीन सोडमिसे याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील गुरुवार पेठेतील प्रकाश मारुती खरात यांच्या बबल्स परमीट रुम ऍण्ड बारमध्ये दि. 17 रोजी नितीन पांडुरंग सोडमिसे हा दारु पिण्यास गेला होता. यावेळी त्यांचे दारुचे 520 रुपये झाले. हे बिल त्यांना मागितले असता बिल देण्यास नकार दिला. तसेच बिल मागितल्याच्या कारणावरुन सोडमिसे याने खरात यांना शिवीगाळ करुन पैसे देणार नसल्याचे सांगितले. उलट तुम्हीच मला रोज 800 रुपये हप्ता द्या असा दम दिला. हप्ता नाही दिला तर मी खून करेन अशी दमबाजी करत खरात यांच्यावर कोयता उगारला.

  याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, सहा.पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी सूचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व महिला पोलीस निरीक्षक श्रीसंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलीस उपनिरीक्षक कदम यांना आरोपीस अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सहा. पोलीस उपनिरीक्षक अविनाश जगताप व डिबी पथकातील कर्मचारी यांनी आरोपी नितीन पाडुरंग सोडमिसे यास तत्काळ अटक केली. तसेच गुन्हय़ात वापरण्यात आलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. अविनाश जगताप करीत आहेत.

Related Stories

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर अज्ञातांनी फेकल्या पेट्रोलच्या बाटल्या

Archana Banage

1 कोटी 80 लाखाच्या कोकेन बाळगल्याप्रकरणी परदेशी नागरिकास अटक

Archana Banage

सातारा तालिमचे कार्य कौतुकास्पद

Patil_p

भूविकास बँकेतील कर्जदारांचे कर्ज माफ

datta jadhav

24 तासात इमारती खाली करा, महाबळेश्वरमधील 45 अनधिकृत बांधकामांना नोटीस

datta jadhav

डॉ. प्रकाश आमटेंना डिस्चार्ज

datta jadhav
error: Content is protected !!