Tarun Bharat

खून करणाऱया ‘त्या’ दोघांना न्यायालयीन कोठडी

प्रतिनिधी/ बेळगाव

फिल्मी स्टाईलने पाठलाग करून रविवारी मध्यरात्री शिवबसवनगर येथे खून करण्यात आला होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. त्या दोघांना मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बसवाणी नाईक व बसवराज दड्डी (दोघेही रा. मुत्यानट्टी, ता. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांसह आणखी एकाने शैबाज पठाण याचा खून केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपासाची चपे फिरवून काही तासांतच या दोघांना अटक केली होती. या प्रकरणातील लक्ष्मण दड्डी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पूर्ववैमनस्यातून हा खून झाला आहे. 4 वर्षांपूर्वी अंगावर चिखल उडाल्यामुळे शैबाज आणि बसवाणी नाईक यांच्यामध्ये वाद होता. शैबाज याने बसवाणी नाईक व सचिन सिद्धाप्पा दड्डी यांच्यावर चाकूहल्ला केला होता. त्यानंतर दसरोत्सवादिवशीच टाटा सुमोतून पाठलाग करून हा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे रविवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात या दोघा संशयित आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. तत्पूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

Related Stories

हिरेबागेवाडीला राज्य परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकांची भेट

Patil_p

हॉटेल वनमालानजीक गतिरोधकाची मागणी

Patil_p

आर. टी. लक्कनगौडर यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

Tousif Mujawar

शहर परिसराला पावसाने झोडपले

Patil_p

अनगोळ शिवारातील मद्यपींचा कचरा केला गोळा

Amit Kulkarni

नरेगामधील कामगारांना काम द्या अन् वेतन वाढवा

Amit Kulkarni