Tarun Bharat

खून प्रकरणातील आरोपीची कारागृहात रवानगी

प्रतिनिधी/ बेळगाव

सिव्हिल हॉस्पिटलमधील रखवालदार महिलेचा खून केल्याच्या आरोपावरुन एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून खुनाचा हा प्रकार घडल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

इराण्णा जगजंपी (वय 22, रा. बैलहोंगल) असे त्याचे नाव आहे. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी इराण्णाला अटक केली आहे. त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशावरुन त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. तत्पूर्वी बुधवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इराण्णाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सुधाराणी बसवराज हडपद (वय 29, मुळची रा. मुगबसव, ता. बैलहोंगल, सध्या रा. कंग्राळी खुर्द) या रखवालदार महिलेचा बुधवारी सकाळी तलवारीने वार करुन भीषण खून करण्यात आला होता.

पोलिसांनी इराण्णाची कसुन चौकशी केली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुधाराणीशी आपले प्रेमसंबंध होते. अलिकडे ती आपल्याला टाळत होती. त्यामुळे आपण तीचा खून केल्याची कबुली या माथेफिरुने दिली आहे. इराण्णाने खुनासाठी वापरलेली तलवार पोलिसांनी जप्त केली आहे.

Related Stories

जिल्हाधिकाऱयांनी केल्या अधिकाऱयांना सूचना

Patil_p

जीएसएसची कराटेपटू सृष्टी जाधवला सुवर्ण

Amit Kulkarni

424 कोरोनाबाधित गर्भवतींची प्रसूती

Amit Kulkarni

केएलएस पब्लिक स्कूलकडून फी कमी करण्यास नकार

Amit Kulkarni

शुक्रवारी 52 वाहने जप्त

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात आता रुग्णवाहिकांची संख्या वाढली

Omkar B