Tarun Bharat

खून प्रकरणातील संशयित पतीला 3 दिवसांची कोठडी

प्रतिनिधी / नागठाणे :   

नागठाणे (ता.सातारा) येथे मालन बबन गायकवाड (वय 55) या महिलेच्या खून प्रकरणातील संशयित पती बबन बाबूराव गायकवाड (60) याला बोरगाव पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा अटक केली होती. बुधवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.       

सोमवारी रात्री उशिरा पत्नी दारू पिते या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या भांडणात बबन गायकवाड याने मालन गायकवाड हिला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. या मारहाणीत मालन गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर बोरगाव पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले होते. बुधवारी दुपारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संशयित बबन गायकवाड याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्यांचा पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ करत आहेत.

Related Stories

पालकमंत्र्याचे पाकीट मारणारा चोरटा पकडला

datta jadhav

शिक्षक बँकेसह जिह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

Patil_p

महिनाखेर बाधितांचा आकडा होईल 10,000 पार

Patil_p

पसरणी घाटात बस उलटून पंधरा जखमी

Patil_p

सातारा : शिंदीगावात 14 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू

Archana Banage

सातारा : गिरीश बापट यांनी केली राज्य सरकार अन् राष्ट्रवादीवर टिप्पणी

datta jadhav