Tarun Bharat

खूषखबर, यंदा पाऊस येणार मोठा..!

कोरोना संकटात पावसाचा दिलासा : यावर्षी 100 टक्के पर्जन्यवृष्टी : हवामान विभागाचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर

पुणे / प्रतिनिधी

 कोरोनाच्या संकटाने त्रासलेल्या देशवासियांना भारतीय हवामान विभागाने चांगली बातमी दिली असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सर्वसाधारण अर्थात 100 टक्क्यांच्या आसपास पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

 हवामान विभागाने दिल्लीत बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हवामान विभागाचा या वर्षातील पहिला दीर्घकालीन अंदाज असून, मे महिन्याच्या शेवटी अथवा जून महिन्याच्या सुरुवातीला दुसरा दीर्घकालीन अंदाज सादर केला जाणार असून, त्यात आणखी अचूक व इतर बाबींच्या माहितीचा समावेश असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

 जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा कालावधी पावसाचा मानला जातो. या कालावधीत 88 सेंटीमीटर इतका पाऊस देशभरात नोंदविला जातो. यंदाही या कालावधीत सरासरीइतक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये 5 टक्के कमी-जास्त प्रमाण गृहीत धरण्यात आले आहे. मान्सून मिशन सीएफएस मॉडेलचा वापर करून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासाठी डिसेंबर व जानेवारीदरम्यान उत्तर अटलांटिक व उत्तर प्रशांत महासागराच्या समुद्रसपाटीचे तापमान, पूर्व आशिया समुद्रातील दाब, प्रशांत महासागरातील गरम पाण्याचा प्रवाह आदी पाच घटकांचा यासाठी अभ्यास करण्यात आला आहे.

 भारतीय मॉडेलच्या अभ्यासानुसार भारतात मान्सूनच्या कालावधीत सर्वसाधारण पावसाची शक्यता 41 टक्के, सरासरीपेक्षा अधिक 21, अतिरिक्त पाऊस 9, सरासरीपेक्षा कमी 20, तर अवर्षणाची शक्यता 9 टक्के वर्तविण्यात आली आहे.

 दुसऱया टप्प्यात कमकुवत एल निनोची शक्यता

 दरम्यान, प्रशांत महासागरात मान्सूनच्या दुसऱया टप्प्यात कमकुवत एल निनो विकसित होण्याचा अंदाज काही जागतिक हवामान मॉडेल्सने वर्तविला आहे. 

Related Stories

सुलतानपूर येथील अनुसूचित समाजाला स्मशानसाठी जागा द्या

Amit Kulkarni

हॉटेल-धाब्यांमध्ये अग्निशमन यंत्र सक्तीचे

Patil_p

कौल कोणाला?, मतदार राजाच ठरणार किंगमेकर

Omkar B

तात्पुरते बसस्थानक हटविले

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हयात गुरुवारी 161 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

पहिल्याच दिवशी जोधपूर विमान फुल्ल!

Amit Kulkarni