Tarun Bharat

खेडमध्ये कोरोना लढ्यात ३०० आरोग्य कर्मचारी राबताहेत!


राजू चव्हाण / खेड

तालुक्यात आधीच अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी कार्यरत आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत असतानाच कोरोनाने आरोग्य विभागाची झोपच उडवली आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी तालुक्यात तब्बल ३०० कर्मचारी दिवस-रात्र राबत आहेत. १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १३० आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दिमतीला १४६ आशा सेविकाही कार्यरत आहेत. आमदार योगेश कदम कोणत्याही क्षणी कोविड सेंटरला भेट देत उपचारांसह औषध साठ्याच्या उपलब्धततेचा आढावा घेण्यावर भर देत आहेत.
तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२३६ वर पोहचली असून आतापर्यंत ५६ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान सुरुच असल्याने आरोग्य यंत्रणेची धावाधावच सुरू आहे. तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कोरोना लढ्यातील कार्यरत आरोग्य यंत्रणा अक्षरश: जेरीसच आली आहे.

आरोग्य विभागात तब्बल ६३ पदे रिक्त आहेत. अपुल्या कर्मचाऱ्यांअभावी कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होणार नाही, याकडे आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून तब्बल ३०० आरोग्य कर्मचारी कोरोना लढ्यात दिवस-रात्र ड्युटी बजावत आहेत. सद्यस्थितीत १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १३० आरोग्य कर्मचारी, १४६ आशा सेविका, ५ कनिष्ठ सहाय्यक, ३ औषध निर्माण अधिकारी कोरोनाच्या मुकाबल्यासाठी अविरतपणे झटत आहेत. आमदार योगेश कदम यांनीही कोरोना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत कोणत्याही क्षणी कोविड सेंटरला भेट देत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुक्यात कळंबणी उपजिल्हा रूग्णालय व लवेल येथील घरडा येथे कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली असून घरडा हॉस्पिटल व वक्रतुंड येथे दोन पेड कोविड सेंटर कार्यान्वित आहेत.

आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने कोरोनाबाधित गंभीर रूग्णांसाठी २० बेडचे आय.सी.यू. कक्ष सुरू करण्यात आले आहेत. एल.पी. इंग्लिश स्कूल येथे ताप आजाराचे केंद्र खुले करण्यात आले आहे. लवेल येथील घरडा कोविड सेंटर येथे १७० बेडस् तर कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात ६५ बेडस् उपलब्ध आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत शहरासह ग्रामीण भागात आरोग्य तपासणीसाठी ७८ पथकांची नियुक्ती करण्यात आली असून २२९ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
तालुक्याची लोकसंख्या १ लाख ६७ हजार ६४७ इतकी आहे. ग्रामीण भागातील १ लाख ४६ हजार ११७ लोकसंख्येतील ४९,९२२ घरांपैकी २७,६२६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ९२ हजार ३७८ जणांची तपासणी करण्यात आली असून २० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील १७ प भागांसाठी ९ पथके तैनात असून २२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २१ हजार ५३० लोकसंख्येतील ६९९४ घरांपैकी ३९७२ घरांचे सर्वेक्षण करून १२१०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

अडचणी निर्माण झाल्यास थेट संपर्क साधा – योगेश कदम
कोविड सेंटर रूग्णालयांमध्ये आवश्यक इंजेक्शन व औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून कमतरता भासल्यास तातडीने उपलब्ध करण्यासाठी कटीबद्ध आहे. कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या आहेत. मात्र, तरीही कोणालाही उपचारांबाबत अडचणी निर्माण होत असल्यास रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार कदम यांनी केले आहे.

Related Stories

घरांवर झाडे कोसळून लाखोंचे नुकसान

Patil_p

चिपळुणातील पार्किंग झोनचे काम सुरू

Patil_p

ग्रुप बुकिंग केल्यास अन्य जिल्हय़ात एसटी

NIKHIL_N

शंभर रुपयाच्या किटच्या प्रतीक्षेत रेशन कार्डधारक

Anuja Kudatarkar

शिवशर्यत – मिनी मॅरेथॉन स्पर्धेत रसिका परब प्रथम

Anuja Kudatarkar

Ratnagiri Breaking : मंडणगडात 4 लाखाच्या पाचशे, हजारच्या जुन्या नोटा जप्त

Abhijeet Khandekar