Tarun Bharat

खेडमध्ये नगरप्रशासन खोकेधारकांमध्ये शाब्दिक चकमक

Advertisements

प्रवेशद्वाराजवळ आक्रमक खोकेधारकांची निदर्शने, तर पुन्हा खोके उभे करणार

प्रतिनिधी / खेड

खेड नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत खोक्यांवर हातोडा फिरवण्याची धडक मोहीम येथील नगरप्रशासनाने हाती घेतली आहे. या कारवाईनंतर नगरप्रशासन व खोकेधारक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. आक्रमक खोकेधारकांनी नगरपरिषदेत प्रशासनाच्या विरोधात निदर्शनही केली. जोपर्यंत अन्य अनधिकृत खोकेधारकांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत येधून हलणार नाही, असा आक्रमक पावित्राही खोकेधारकांनी घेतला.

शहरातील शिवतररोड, महाडनाका, क्षेत्रपालनगर, नाना – नानीपार्क, समर्थनगर, बाजारपेठ व अन्य प्रभागांतील अतिक्रमणे हटवण्यात आली. नगरप्रशासनाने ही कारवाई आकसापोटी केल्याचा आरोप खोकेधारकांनी केला आहे. गेले १० ते १५ वर्षांपासून अनधिकृतपणे उभ्या असलेल्या खोकेधारकांवर कारवाई का करण्यात येत नाही ? असा सवाल उपस्थित करत गेल्या ८ दिवसात बाढीव गाळे व अनधिकृत खोक्यांवर कारवाई न केल्यास हटवण्यात आलेले खोके पुन्हा उभे करू, असा गर्भित दशाराही खोकेधारकांनी दिला आहे.

मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे व खोकेधारक यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. माजी आमदार संजय कदम व नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचीही खोकेधारकांनी भेट घेत घडलेला प्रकार कथन केला. नगरप्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ खोकेधारकांनी निदर्शने केली. एकीकडे कोरोनाच्या संकटात बेरोजगार तरुण भरडलेले असताना दुसरीकडे मात्र नगरप्रशासनाने खोके हटवून अतोनात नुकसान केले आहे ? यास जबाबदार कोण ? असा संतप्त सवालही उपस्थित केला.

Related Stories

वरसोली येथे पॅरासेलिंग अपघात ; दोन महिला बचावल्या

Sumit Tambekar

राणेंच्या मंत्रीपदाचा दोडामार्गाला नक्कीच फायदा

NIKHIL_N

‘घुंगुरकाठी’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी

NIKHIL_N

संचारबंदी तोडून विवाह सोहळा दोन्ही यजमानांसह चौघांवर गुन्हा

Patil_p

जिल्हा नियोजनचा 170 कोटी निधी प्राप्त

NIKHIL_N

तौक्ते चक्रीवादळाने गती बदलल्याने रत्नागिरी जिल्हयात मोठे नुकसान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!