Tarun Bharat

खेडमध्ये प्रशासकीय यंत्रणांच्या कर्मचाऱयांचे घेताहेत स्वॅब

Advertisements

प्रतिनिधी/ खेड

तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 16 वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा दिवस-रात्र कार्यरत आहे. या प्रशासकीय यंत्रणातील कर्मचाऱयांचा चाकरमान्यांशी सातत्याने संपर्क येत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासकीय यंत्रणेतील पोलीस, महसूल व वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱयांच्या स्वॅबचे नमुने घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, पुणेसारख्या हॉटस्पॉटमधून गावी येणाऱया चाकरमान्यांचा ओघ झपाटय़ाने वाढला आहे. कशेडी चेकपोस्टवर गेल्या 2 महिन्यांपासून पोलीस, महसूल व अन्य विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱयांचा सातत्याने चाकरमान्यांशी संपर्क येत असतो. या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचाऱयांच्या स्वॅबचे नमुने घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात पहिल्या टप्प्यात प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले. यानंतर इतर अधिकारी व कर्मचारी, पोलीस मित्र व संबंधित कर्मचाऱयांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.

60 जणांचे अहवाल निगेटिव्ह

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी दिवस-रात्र डय़ुटी बजावणाऱया प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱयांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात 60 जणांचे स्वॅबचे नमुने घेऊन मिरज येथे पाठवण्यात आले होते. शनिवारी रात्री अहवाल प्राप्त झाले आहेत. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने साऱयांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

Related Stories

निधी 5 लाख, थकीत बिले 8 लाख; विकासकामे करायची कोणती?

NIKHIL_N

शिवसेना नवरात्रौत्सव अध्यक्षपदी राजू शेटये सचिवपदी राजू राणे

NIKHIL_N

निवडणुक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी पणजीत नियंत्रण कक्ष

Abhijeet Khandekar

जिल्हय़ात तपासणी नाक्यांवर चाकरमान्यांची गर्दी

Patil_p

भु-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी

Anuja Kudatarkar

कोरोना योध्दय़ा अंशकालीन स्त्री परिचर मानधनापासून वंचित

Patil_p
error: Content is protected !!