Tarun Bharat

खेड, दापोलीत संततधार, रत्नागिरीत उघडीप!

खेडचे मटण-मच्छीमार्केट तिसऱयांदा पुराच्या पाण्यात, नारंगीला पूर

प्रतिनिधी/ रत्नागिरी, खेड

वादळी वाऱयासह आभाळ फाटल्यागत कोसळणाऱया पावसाने मंगळवारी जिल्हाभरात दाणादाण उडवून दिली होती. पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या घटनांनी आपत्कालीन यंत्रणेचीही पळापळ उडाली. जिल्हा ‘रेड अलर्ट’वर असताना बुधवारी रत्नागिरीत मात्र पावसाने दिवसभर उघडीप दिली. अधूनमधून सोसाटय़ाच्या वाऱयासह तुरळक पावसाच्या सरी बरसत होत्या. विशेषतः खेड व दापोली तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. खेड शहरातील मटण-मच्छी मार्केट तिसऱयांदा पुराच्या पाण्यात अडकले. नारंगी नदीला पूर आला. दापोलीतही पावसाचा जोर ओसरला नव्हता. अन्य तालुक्यातही काही ठिकाणी पावसाने थोडी विश्रांती घेतली. राजापूर, संगमेश्वरात शिरलेले पुराचे पाणी ओसरले असून पावसाने पुन्हा जोर धरल्यास पुराची भीती कायम आहे.

  कोकण किनारपट्टीला वादळी वाऱयासह मुसळधार ते अतिमुसळधारचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर रत्नागिरी जिल्हय़ाला 8 जुलैपर्यंत ‘रेड अलर्ट’चा इशारा दिला आहे. त्यामुळे पावसाच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी येथील प्रशासन यंत्रणाही अलर्टवर आहे. नागरिकांना खबरदारीच्या सूचना प्रशासनस्तरावरून दिल्या आहेत. जिल्हय़ात कोसळणाऱया अतिमुसळधार पावसाने सोमवार, मंगळवार असे दोन दिवस चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे खेड, चिपळूण, राजापूर, लांजा, रत्नागिरी या भागात पूरस्थितीही निर्माण झाली. येथील नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना, घरे व इतर मालमत्तांच्या नुकसानीच्या घटना घडल्या. पावसामुळे जिल्हय़ातील 152 कुटुंबातील 479 लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. 51 गावे बाधित झाली होती तर 67 घरांचे अंशतः नुकसान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

  नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

पावसाचा जोर पुढील काळात कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पण रत्नागिरीत बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर ओसरला होता.    सोसाटय़ाच्या वाऱयासह बुधवारी तुरळक पावसाच्या सरी कोसळत होत्या. तर पावसाची उघडीप मिळाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला होता. मंगळवारी निर्माण झालेली पूरस्थितीही ओसरल्याचे चित्र होते. तरीही जिल्हय़ाला ‘रेड अलर्ट’ दिला असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  बुधवारी सकाळपर्यत झालेल्या 24 तासात जिल्हय़ात सर्वच तालुक्यात धुवाधार पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यात मंडणगड 195 मिमी, दापोली 224 मिमी, खेड 109 मिमी, गुहागर 153 मिमी, चिपळूण 165 मिमी, संगमेश्वर 144 मिमी, रत्नागिरी 93 मिमी, लांजा 191 मिमी, राजापूर 149 मिमी इतक्या पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या दिवशी जिल्हाभरात एकूण 1423 पर्जन्यमानाची 158.11 सरासरी इतकी नोंद करण्यात आली आहे.

                    खेडमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल

सलग 2 दिवसापासून थैमान घालणाऱया पावसाने बुधवारीही धुमाकूळ घातल्याने खेड शहरातील मटण-मच्छी मार्केट तिसऱयांदा पुराच्या पाण्यात अडकले. मुख्य बाजारपेठेत पाणी घुसण्याच्या शक्यतेने व्यापाऱयांच्या उरात पुन्हा धडकी भरली. नारंगी नदीला आलेल्या पुराचे पाणी खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंगनजीक घुसल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. दिवसभर पावसाचा जोर कायम होता. एनडीआरएफचे पथकही येथे दाखल झाले आहे.

 धो-धो कोसळणाऱया पावसामुळे सलग दोनवेळा मटण-मच्छी मार्केट पुराच्या विळख्यात अडकलेले असताना तिसऱया दिवशीही परिस्थिती कायम राहिली. पावसाचे थैमान सुरूच राहिल्याने मुख्य बाजारपेठेत पाणी घुसण्याचा संभाव्य धोका लक्षात घेत काही व्यापाऱयांनी दुकानातील साहित्य सुरक्षितस्थळी हलवून दुकाने रिकामी केली. दुपारच्या सुमारास पावसाने काही वेळ घेतलेल्या विश्रांतीमुळे पूरस्थितीचा धोका टळताच व्यापाऱयांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने व्यापाऱयांची भीती कायम राहिली.

धुवाधार कोसळणाऱया पावसामुळे नारंगी नदीलाही पूर आला. पुराचे पाणी खेड-दापोली मार्गावरील एकविरानगर येथील रस्त्यावर घुसताच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या मार्गावरून धावणारी वाहतूक शिवतरमार्गे वळवण्यात आली. या मार्गावरून धावणाऱया अवजड वाहनांनाही तातडीने ब्रेक लावण्यात आला. नजीकची भातशेतीही पाण्यात गेली. शिवतररोड येथील प्रमोद खेडेकर यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून हानी झाली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. एनडीआरएफचे पथकही येथे बुधवारी सकाळी दाखल झाले. प्रांताधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरीक्षक निशा जाधव, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी परिस्थितीची पाहणी करत एनडीआरएफच्या पथकाला सूचना केल्या.

                    फत्तेगड, दाभोळ, इकबालनगरमधील पुटुंबांचे स्थलांतर

मौजे दापोली ः गेल्या 2 दिवसांपासून दापोलीत पावसाचा प्रकोप पहायला मिळत आहे. मुसळधार कोसळणाऱया पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच मुगीज येथील इकबालनगर, पाजपंढरीमधील फत्तेगड, दाभोळमधील दोरसई येथील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. तालुक्यात मंगळवारी तब्बल 210.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रात करण्यात आली.   सोमवारी सायंकाळपासून वाऱयासह कोसळणाऱया पावसाचा सामना दापोलीकरांना करावा लागत आहे. वारा सुरू झाल्यावर समुद्रालगतच्या ग्रामस्थांच्या उरात धडकी भरत आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडून विविध छोटय़ा-मोठय़ा केबल तुटल्या आहेत. काही ठिकाणी घरांच्या संरक्षक भिंती कोसळून नुकसान झाले. मंगळवारी शहरातील युसूफ हमद फकीर यांच्या जुन्या बंद घराची भिंत पडून सुमारे 12 हजार, गिम्हवणे येथील कैलास गांधी यांच्या घराभोवती असणारी संरक्षक भिंत कोसळून 22 हजार तर मंगेश सावंत यांची संरक्षण भिंत कोसळून हजारोंचे नुकसान झाले. तसेच इतरही अनेक ठिकाणी लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. पावसाचा प्रकोप वाढल्याने धोकादायक ठिकाणांहून कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. यात इकबालनगर येथे एका घराची संरक्षक भिंत कोसळल्याने इतर 5 घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या 5 घरातील 29 लोकांना जवळील उर्दू शाळेत तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. फत्तेगड येथील 1 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून हे पुटुंब नातेवाईकांकडे गेले आहे. दाभोळ येथील ढोरसई येथील 4 कुटुंबियांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आल्याचेही समोर आले आहे. बुधवारीही पावसाचा

Related Stories

िजह्यात एसटी प्रवासी संख्येत होतेय वाढ

Patil_p

8000633872 वरुन आलेल्या व्हॉट्स ॲप संदेशावर विश्वास ठेवू नये- जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन

Anuja Kudatarkar

Ratnagiri : धडेकत पादचारी ठार, कारचालकावर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

रिफायनरीचा विरोध करणाऱयांची जंत्री शासनाकडे

Patil_p

आरोग्यमंत्री म्हणतात, रत्नागिरीत जिल्हय़ात डेल्टा प्लसचे 9 रुग्ण

Patil_p

जुगार खेळताना अकराजण ताब्यात

NIKHIL_N