Tarun Bharat

खेड पोलिसांकडून अडकलेल्या दोन ट्रेकर्सची सुखरूप सुटका

प्रतिनिधी / खेड

खेड तालुक्यातील किल्ले सुमारगड येथे ट्रेकिंगसाठी गेलेले दोन ट्रेकर्स जंगलात अडकून पडले होते. ही बाब येथील पोलिसांना कळल्यानंतर तातडीने पोलीस फौज फाटा रवाना करून दोघांचीही सुखरूप सुटका केली. पोलिसांच्या कामगिरीचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
राजकुमार परबती जाधव, ओंकार परबती जाधव अशी दोन ट्रेकर्सची नावे आहेत. हे दोघेजण शनिवारी सकाळच्या सुमारास किल्ले सुमारगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. दुचाकी वाडीबेलदार येथे पार्क केली होती. ट्रेकिंग करत असताना अचानक वाट चुकल्याने ते एका डोंगरात अडकले.

याबाबत तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याशी त्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी क्षणाचाही विलंब न लावता सायंकाळी ४ वाजता आंबवली बीट अंमलदार व सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र बुरटे, पोलीस कॉ. नितीन चव्हाण यांना घटनास्थळी पाठवले. पोलीस पाटील भार्गव चव्हाण, माजी सरपंच पांडुरंग शिंदे, विकास शिंदे यांच्या मदतीने दोघांचा शोध घेत दोन्ही ट्रेकर्सना वाडीजैतापूर येथे सुखरूप आणले.

Related Stories

आता स्वयंअध्ययनाचा पर्याय

NIKHIL_N

‘कुटुंब नियोजना’त सिंधुदुर्ग अगेसर

NIKHIL_N

संगमेश्वर तालुक्यात चौपदरीकरणाचे काम रखडलेलेच

Patil_p

स्कि, कार्निव्हल, इटलीतून जर्मनीत कोरोना प्रसार

Patil_p

जैतापूर प्रकल्प परिसरातील अडीच लाख रूपयांच्या साहित्याची चोरी

Patil_p

अभाविपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Patil_p