Tarun Bharat

खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र सलग दुसऱया वषी विजेते

Advertisements

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिसऱया पर्वात वर्चस्व राखत महाराष्ट्राने सलग दुसऱया वषी विजेतेपद पटकाविले. मागील वषी पुण्यात झालेल्या दुसऱया खेलो इंडिया स्पर्धेत 227 पदकांसह महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले होते. यंदा मात्र, त्यापेक्षाही अधिक 256 पदकांची कमाई करुन महाराष्ट्र अजिंक्मय ठरला आहे. त्यापाठोपाठ हरियाणा 200 पदाकांसह द्वितीय आणि दिल्ली 122 पदकांसह तृतीय क्रमांकवर आहे.

गुवाहटी येथील नबीन चंद्र बार्डोली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळय़ात केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामेश्वर तेली, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, अर्थमंत्री हेमंत विश्वकुमार यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाचे सहसचिव इम्तयाझ काझी, सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांसह सर्व संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.

या स्पर्धेत महाराष्ट्राने 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्यपदकाची पदकांची कमाई केली आहे. हरियाणाने 68 सुवर्ण, 60 रौप्य आणि 72 कांस्य तर दिल्लीने 39 सुवर्ण, 36 रौप्य आणि 47 कांस्यपदके पटकावली.

Related Stories

यु मुम्बाच्या विजयात गुमानसिंगची चमक

Patil_p

बांगलादेश संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी जॉन लेविस

Patil_p

नायके-नेमार यांच्यातील करार रद्द

Patil_p

भारतीय टेबल टेनिसपटूकडून निराशा

Patil_p

साबालेन्काला पराभवाचा धक्का

Patil_p

इंग्लंडच्या रूटचे 19 वे कसोटी शतक

Patil_p
error: Content is protected !!