Tarun Bharat

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचा लोगो १ एप्रिल रोजी होणार रिलीज

बेंगळूर : प्रतिनिधी

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2021 कर्नाटकात आयोजित केले जाणार आहेत. 24 एप्रिल ते 3 मे दरम्यान या स्पर्धा होतील असे युवा आणि क्रीडा व्यवहार मंत्री के. सी. नारायण गौडा यांनी बुधवारी सांगितले. राज्य सरकारने सर्व तयारी सुरू केली असून कार्यक्रमांसाठी लोगो, थीम साँग आणि जर्सी 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेंगळूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, खेळांच्या दुसऱ्या सत्राचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सुमारे 20 क्रीडा स्पर्धा होणार आहेत. राज्यभरातील 200 विद्यापीठांतील 8,000 हून अधिक विद्यार्थी आणि कर्मचारी या कार्यक्रमात भाग घेतील, असे मंत्री म्हणाले. जैन विद्यापीठ परिसर आणि कांतीरावना स्टेडियमवर हा कार्यक्रम होणार असून कन्नड रॅपर चंदन शेट्टी यांनी थीम सॉंग तयार केले आहे, असेही मंत्री म्हणाले.

Related Stories

जगभरात 87.52 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

आसाम-मिझोराममधील हिंसाचारात 6 पोलीस ठार

Patil_p

उत्तराखंड : 15 एप्रिलपासून सुरू होणार इयत्ता 6 वी ते 9 वीचे नवीन शैक्षणिक सत्र

Tousif Mujawar

अँटिग्वा-बारबुडामध्ये पोहोचला मेहुल चोक्सी

Amit Kulkarni

कोरोनावरील TOCIRA औषधाला मंजुरी

datta jadhav

मोदी, शहा यांच्या तालावर ईडी नाचत आहे : जयराम रमेश

Abhijeet Khandekar