Tarun Bharat

खेळाडूंच्या हॉटेलपासून अवघ्या 30 किलोमीटर्स अंतरावर विमान कोसळले!

सिडनी

 ऑस्ट्रेलियातील सिडनीत जेथे भारतीय खेळाडूंचे हॉटेल आहे, तेथून साधारणपणे 30 किलोमीटर्स अंतरावर एक विमान कोसळल्याने खळबळ उडाली. या अपघातात विमानातील दोघे जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.

सिडनीतील स्थानिक प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 4.30 वाजता सदर विमान कोसळले. या विमानाचे इंजिन मध्येच बंद पडल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. इमर्जन्सी लँडिंग करावे लागणार, हे निश्चित झाल्यानंतर क्रॉमर पार्कच्या दिशेने विमान वळवले गेले. क्रॉमर पार्कवर जेथे विमान कोसळले, तेथे फुटबॉल व क्रिकेटचे सामने भरवले जातात.

शनिवारी हा अपघात घडला, त्यावेळी काही जण या मैदानावर फुटबॉल, क्रिकेट खेळत होते. विमान आपल्या दिशेने येत आहे, हे लक्षात येताच या सर्वांची तारांबळ उडाली. सुदैवाने यातील कोणालाही इजा झाली नाही.

Related Stories

क्रिकेट ऑस्टेलियाच्या सीईओची उचलबांगडी ?

Patil_p

भारत-व्हिएतनाम फुटबॉल सामना आज

Patil_p

ऑस्ट्रेलियातील ए लीग स्पर्धा 16 जुलैपासून

Patil_p

अर्सेनलचा एकतर्फी विजय

Patil_p

ब्राझीलच्या रोनाल्डीन्होला कोरोनाची बाधा

Patil_p

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विस्ताराची योजना

Patil_p