Tarun Bharat

खैर झाडांची बेकायदेशीर कत्तलप्रकरणी पाचजणांना अटक

ओमनी कारने खैर तस्करी करणारी टोळी गजाआड

प्रतिनिधी / फोंडा

बेतोडा पंचायत क्षेत्रातील कोडार येथील सोमनाथ देवस्थानाजवळ खैरीच्या झाडाची कत्तलप्रकरणी पाच जणांना फोंडा वनखात्यातर्फे अटक करण्यात आली आहे. सुमारे रु.   50 हजार किंमतीची एकूण 43 खैरीच्या झाडाची बेकायदेशीर कत्तल केलेली झाडे फोंडा वनखात्यातर्फे जप्त करण्यात आली. गोव्याहून खैर झाडाची तस्करी महाराष्ट्रात करण्याच्या बेतात वापरण्यात आलेली ओमनी कारही जप्त करण्यात आली आहे. काल बुधवार दुपारी 1.30 वा. सुमारास ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी मुख्य संशयित अक्षय उर्फ सचिन विठोबा गावडे (मूळ. महाराष्ट्र रा. गोवा) व जीए 03 पी 1285 या क्रमांकाची ओमनीकार जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय संदीप मालवणकर, जितेंद्र पर्येकर, लक्ष्मण पर्येकर, मोहन मालवणकर या संशयितांना अटक करण्यात आली आहे. खैरीच्या झाडाची बेकायदेशीरित्या तस्करी करण्यात येत असल्याचा सुगावा फोंडा वनखात्याला लागताच सापळा रचून ही धाड टाकण्यात आली होती. फोंडा वनखात्याचे अधिकारी संतोष फडते, वनअधिकारी दीपक बेतकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत  नाईक, सचिन सावंत, देऊ शेटकर, दीपा रेडकर, रामा डेवगुणकर, अक्षय गावस, अली शेख, प्रदीप गावकर यांच्या टिमने ही कारवाई केली.

Related Stories

मंत्री मिलिंद नाईक यांच्यावरील खनीज चोरीचे आरोप खोटे

Patil_p

बेती गुऊद्वारा चोरी प्रकरणी संशयित दिल्लीत जेरबंद

Amit Kulkarni

‘गोय स्वातंत्र्याचे होमखण’ माहिती पट सीडीचे प्रकाशन

Amit Kulkarni

व्यावाहारातील चिकाटी व सामाजिक बांधिलकीमुळे व्हीपीके प्रगतीपथावर

Amit Kulkarni

2022च्या विधानसभा निवडणुकीत भाजप अन्य पक्षांशी युती करणार नाही

Patil_p

आम्ही पती-पत्नी एकाच पक्षातून लढणार

Amit Kulkarni