Tarun Bharat

“खोटारड्या ऊर्जामंत्र्यांवर गुन्हा दाखल करा”

गोडोली / प्रतिनिधी

लाँकडाऊनच्या काळातील सामाजिक व्यवस्था ठप्प झाली होती. त्यामुळच्या वीज बीलाबाबत सतत खोटी आश्वासने देत नागरिकांची ऊर्जा मंत्र्यांनी समाजाची फसवणूक केली आहे.मनसेचे अध्यक्षांना ऊर्जा मंत्र्यांनी दिलेल्या शब्द पाळला नसल्याने तिघाडी सरकारचे काम बिघाड असल्याने थेट ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला असल्याचे शहर अध्यक्ष राहूल पवार यांनी ‘तरुण भारत ‘शी बोलताना सांगितले.

कोरोना काळात सर्वांचे उद्योग धंदे, नोकऱ्या ठप्प झाल्या असताना वीज बिल कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाठ वीज बिल आकारले गेली होती. ती कमी करण्याबाबतीत वारंवार खोटी आश्वासने ऊर्जा मंत्री आणि त्यांच्या विभागाने जाहीर केली होती.

तत्कालीन परिस्थिती बिकट होती. अजूनही सामाजिक परिस्थिती सुधारली नसताना सर्व सामान्यांना वीज बिल भरणे, केवळ अशक्यच होते. जनतेच्या या जीवहळ्याचा प्रश्नासाठी राज्यात फक्त मनसेचे पदाधिकारी सतत प्रयत्नशील आहेत.
मनसे नेते बाळा नांदगावकर व पक्षाचे शिष्ट मंडळ हे काही दिवसांपूर्वी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी यावर आम्ही नक्की विचार करू व लवकरच गोड बातमी देऊ अशा प्रकारचे आश्वासन दिले होते.त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते पदाधिकारी यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. त्यावेळी चर्चा करून त्यांनी आम्ही लक्ष घालून योग्य ते निर्णय घेऊ असा शब्द दिला.

ऊर्जा मंत्र्यांनी स्वतःच्या विधानावरून घुमजाव करत वीजबिल हे सर्वाना भरावेच लागेल, याच मुद्द्यांवर आक्रमक होऊन बील भरण्यासाठी राज्यातील जनतेला वेठीस धरले आहे. फसवणाऱ्या खोट बोलणाऱ्या ऊर्जा मंत्र्या विरोधात मनसे आक्रमक झाली असून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सातारा शहर मनसे तर्फे सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी शहर पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना तक्रारीचे निवेदन दिले आहे.

यावेळी शहर अध्यक्ष राहुल पवार, मनसे अँड. मुश्ताक बोहरी,जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे,शहर उपाध्यक्ष भरत रावळ,वैभव वेळापुरे,
दिलीप सोडमिसे, गणेश पवार, चैतन्य जोशी, अविनाश भोसले, अनिकेत साळुंखे,मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

सहकार भारतीचे उपक्रम सहकारी संस्थांसाठी उपयुक्त : अनंतराव जोशी

Archana Banage

साताऱ्यात पूर्वप्राथमिक शिक्षिका, सेविका संघाचे थाळीनाद आंदोलन

datta jadhav

सातारकर हादरले; गर्दीला बेक

Patil_p

शिवराज्यभिषेकाच्या दिनानिमित्त खाकीचेही रक्तदान

Patil_p

कराडात मास्क नसेल तर दंड भरा

Patil_p

साताऱ्यात मुक्तीदर ७८.१२ टक्क्यांवर

Archana Banage