Tarun Bharat

खोटा दस्त करुन फसवणूक; चौघांवर गुन्हा

प्रतिनिधी/ सातारा

जमीन गहाण असताना त्या गहाणमुक्त न करता खोटा दस्त करून जमिनीची विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी कोडोली येथील एका महिलेसह चार जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 ऑगस्ट 2020 रोजी अशोक संभाजी गायकवाड (वय 71, रा. कोडोली, ता. सातारा) त्यांचे पूर्व हक्कदार आजोबा महादू पिराजी गायकवाड यांनी कै. शिवराम शंकर बनसोडे त्यांचा चुलत भाऊ शंभू लक्ष्मण बनसोडे यांनी घेतलेल्या सोसायटीचे कर्ज भागवण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या कै. शिवराम शंकर बनसोडे यांच्या वडिलांची जमीन खरेदी दस्ताने पाच वर्षाकरिता गहाण ठेवलेल्या होत्या.

त्या जमिनी कै. शिवराम शंकर बनसोडे व त्यांच्या वारसांनी गहाणमुक्त केल्या नाही. याबाबतची माहिती शिवराम शंकर बनसोडे यांच्या वारसदारांना होती. असे असताना अशोक संभाजी गायकवाड यांच्या आजोबांची नोंद कमी करून बेकायदेशीररित्या दस्त तयार करून जमिनीची विक्री करून फसवणूक केल्याबद्दल दिलीप बाबू बनसोडे (वय 46), संजय बाबू बनसोडे (वय 48), लक्ष्मी अनिल गाडे (वय 40) आणि नंदकुमार विठ्ठल सुतार (वय 38, सर्व रा. कोडोली, ता. सातारा यांच्याविरोधात अशोक संभाजी गायकवाड यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मछले करत आहेत.

Related Stories

पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

datta jadhav

‘शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा’

Archana Banage

महाराष्ट्र : 3,431 नवीन कोरोनाबाधित; 71 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

सातारा : दिवसभरातील 37 जणांसह जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे चौथे शतक

Archana Banage

इस्लामपुरातील फरारी नगरसेवक खंडेराव जाधवास आंबा येथे अटक

Archana Banage

अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला साताऱ्यातून मिळावा

datta jadhav