Tarun Bharat

खोटी माहिती पसरवण्यापेक्षा जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवा; प्रियांका गांधींची टूलकिटवरून भाजपवर टीका

Advertisements

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत संकटातही काँग्रेस राजकारण करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने एक टूलकिट तयार केल्याचा आरोप केला. यावरून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका. जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा”, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे. तसेच हे टूलकीट फेक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. टूलकीटचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यावर फेक असा उल्लेख करण्यात आला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव गौडा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे. तसेच याप्रकरणी भाजप प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संबित पात्रा यांनी नेमके काय म्हटले आहे ?

संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, महामारीच्या वेळी काँग्रेसने ‘टूलकिट’ च्या माध्यमातून सरकारला घेराव घालण्यासाठी अनेक मार्गांनी देशात गोंधळ निर्माण करून राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी महामारीचा उपयोग पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला डागाळण्याची संधी म्हणून केला. तसेच कोरोनातील नव्या व्हायरसचे नाव मोदी व्हायरस ठेवण्याच्या सूचना कॉंग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. कॉंग्रेसने परदेशी पत्रकारांच्या मदतीने भारताची बदनामी करण्याचे कसलाही कसूर सोडली गेली नाही, असे आरोप संबित पात्रा यांनी काँग्रेसवर केले आहेत.

Related Stories

तडवळ रोडवर ५६ हजार १५० रूपयाचा गुटखा जप्त

Sumit Tambekar

गुगलविरुद्ध भारतात चौकशीचे आदेश

Sumit Tambekar

लाच दिल्याशिवाय कामच होत नाही!

Patil_p

उत्तर प्रदेश विधानसभा उपाध्यक्षपदी नितीन अग्रवाल

Patil_p

आदित्यास्त्राने कट्टर शिवसैनिक चार्ज, समाजमाध्यमासह प्रत्यक्षात मिळणारा प्रतिसाद बंडखोरांचे खच्चिकरण करणारा

Rahul Gadkar

क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र

Abhijeet Shinde
error: Content is protected !!