Tarun Bharat

खोदाई कामामुळे डेनेज वाहिनीचे नुकसान

कलामंदिर परिसरात सांडपाणी साचल्याने विहिरींचे पाणी दूषित : डेनेज वाहिनी तुंबण्याच्या प्रकाराने रहिवाशांना त्रास

प्रतिनिधी / बेळगाव

कलामंदिरच्या जागेत बहुमजली व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी खोदाईच्या कामामुळे डेनेज वाहिन्यांचे नुकसान होत असल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. क्यापारी संकुलाच्या उभारणीसाठी खोदाई करताना येथील डेनेज वाहिनीचे नुकसान झाल्याने सांडपाणी साचून परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाल्याची तक्रार होत आहे.

बहुमजली व्यापारी संकुलाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण या परिसरातील डेनेज वाहिन्या स्थलांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले नाही. त्यामुळे जागेमधून जाणाऱया डेनेज वाहिन्यांचे वारंवार नुकसान होत आहे. नुकसान  झालेल्या डेनेज वाहिनींमधून सांडपाणी वाहून संकुलाच्या उभारणीकरिता खोदण्यात आलेल्या खड्डय़ाला तलावाचे स्वरूप आले आहे. खड्डय़ातील सांडपाणी पाझरत असल्याने शुक्रवार पेठ परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. या ठिकाणी खड्डय़ात पाणी साचत असल्याने काम बंद ठेवावे लागत असल्याने काहीवेळा पाईपच्या तोंडावर माती घालून पाणी अडविण्यात आले आहे. परिणामी टिळकवाडी परिसरातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये सांडपाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. टिळकवाडी परिसरातील डेनेज चेंबर तुंबले असून रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठिकठिकाणी डेनेज चेंबर ओव्हरफ्लो होत असून सांडपाणी गटारीमध्ये सोडण्यात आल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कलामंदिर परिसरातील समस्या कित्येक दिवसांपासून निर्माण झाली असून येथील डेनेज वाहिन्या स्थलांतर करण्याची गरज आहे. पण डेनेज वाहिन्या स्थलांतर करण्यापूर्वीच खोदाईचे काम हाती घेण्यात आल्याने समस्या निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटीकरिता विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. पण नागरिकांना समस्या निर्माण होऊ नये, याकरिता आवश्यक खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

इमारत जैथे थे ठेवून व्यापारी संकुलाची उभारणी करणार का?

कलामंदिर परिसरातील भाजीमंडईची इमारत हटविण्यात आली. पण काँग्रेस रोड रुंदीकरणातील नुकसानग्रस्तांनी न्यायालयात धाव घेऊन इमारत हटविण्यास स्थगिती घेतली आहे. त्यामुळे कलांमदिर परिसरातील दोन इमारती वगळून सर्व इमारती हटविल्या आहेत. पण सदर इमारतीसभोवती खड्डा खोदण्यात आला आहे. इमारतीचा विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा व रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त इमारतधारकांना ये-जा करण्यासह व्यवसाय करण्यास अडचण निर्माण झाली आहे. अशातच डेनेजचे पाणी साचत असल्याने आरोग्य धोक्मयात आले आहे. नुकसानभरपाईबाबत तोडगा काढण्याची मागणी स्मार्ट सिटी कंपनीकडे करण्यात आली होती. पण नुकसानग्रस्तांना केवळ आश्वासन देण्यात येत आहे. इमारत जैथे थे ठेवून व्यापारी संकुलाची उभारणी करणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. पण इमारतीसभोवती खोदाई केल्याने इमारत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे जीवितहानी होण्याची शक्मयता आहे. याची दखल स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी व जिल्हा प्रशासन घेणार का? अशी विचारणा होत आहे.

Related Stories

बेंगळूरला जाणारे ट्रक्टर अडविल्याने शेतकरी संतापले

Patil_p

डॉ.सतीश चौलीगर यांचा किरण जाधवकडून सत्कार

Omkar B

काँग्रेस रोड-खानापूर रोडवर वाहनांची कोंडी

Amit Kulkarni

आठवडी बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा

Patil_p

दुतोंडी साप, कासव विकताना वृद्धाला अटक

Amit Kulkarni

पंत बाळेकुंद्रीला बसफेऱया वाढवा

Amit Kulkarni