Tarun Bharat

खोपटातील स्फोटात एकजण ठार

प्रतिनिधी/ लांजा

घरामध्ये जेवण करत असताना अचानक स्फोट होऊन 45 वर्षीय प्रौढाचा मृत्यू ओढवल्याची घटना गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास तालुक्यातील शिपोशी-बौध्दवाडी येथे घडली. मात्र नेमका स्फोट कशामुळे झाला, याचा उलघडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणी लांजा पोलीस तपास करत आहेत.

   या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिपोशी येथील रमेश बंडू मोहिते (45) याचा या स्फोटात मृत्यू झाला. रमेश विवाहित असून कुटुंबियांपासून अलिप्त एका खोपटीत राहत होते. गुरूवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान त्यांच्या खोपटीतून स्फोटाचा जोरदार आवाज आल्याने त्यांच्या भाऊ प्रकाशने खोपटीकडे धाव घेतली. यावेळी रमेश जखमी अवस्थेत छातीवर हात धरून खोपटीबाहेर आले. प्रकाशने त्यांना आपल्या घरी नेले. छातीतून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी मान व छातीवर कापड गुंडाळून ठेवले. रक्तस्त्राव न थांबल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

  शिपोशीच्या पोलीस पाटीलांनी ही घटना लांजा पोलीस स्थानकात कळवताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय धुमासकर, हेडकान्स्टेबल अरविंद कांबळे, नितीन पवार, राजेश वळवी, नरेश कदम, चालक राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मात्र ज्हा स्फोट नेमका कशाचा झाला, या बाबत नेमका खुलासा झालेला नाही. स्फोटाविषयी अधिक तपास करण्यात येत आहे. मृताचा भाऊ प्रकाश मोहिते यांनी लांजा पोलिसात खबर दिली आहे.

Related Stories

प्रधानमंत्री जनकल्याण अंतर्गत उद्या बांदा येथे कॅम्प

NIKHIL_N

व्हेल, डॉल्फिन, कासव संरक्षणासाठी अमेरिकेचा आग्रह

NIKHIL_N

दापोली पंचायत समितीचे माजी सभापती श्रीपत पवार यांचे निधन

Archana Banage

फोंडाघाटवासीयांकडून आजीला जीवनआनंदचा ‘अर्था’सह आधार

NIKHIL_N

रत्नागिरी : चारचाकी वाहनामधील मोबाईल चोरट्याने लांबवला

Archana Banage

विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाचा निकाल १०० टक्के

Anuja Kudatarkar