Tarun Bharat

ख्रिस्तियानो रोनाल्डोचे दुहेरी गोल

Advertisements

वृत्त संस्था/ रोम

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात ऍटलांटाने मँचेस्टर युनायटेडला 2-2 असे गोल बरोबरीत रोखले. या सामन्यात मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळताना पोर्तुगालच्या रोनाल्डोने शेवटच्या काही मिनिटामध्ये दोन गोल करून आपल्या संघाला बरोबरी मिळवून दिली.

या सामन्यात ऍटलांटातर्फे जोसेफ इसिक आणि झॅपाटा यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. शेवटच्या 10 मिनिटांच्या कालावधीत रोनाल्डोने दोन गोल नोंदवून मँचेस्टर युनायटेडला पराभवापासून वाचविले. या स्पर्धेत फ गटात मँचेस्टर युनायटेडचा संघ  4 सामन्यांतून 7 गुणांसह पहिल्या स्थानावर असून ऍटलांटा तिसऱया स्थानावर आहे. या स्पर्धेतील अन्य सामन्यात बार्सिलोनाने डायनामो किव्हचा 1-0, बायर्न म्युनिचने बेनफिकाचा 5-0, ज्युवेंट्सने झेमिटचा 4-2, व्हिलारेलने यंग बॉईजचा 2-0 असा पराभव केला.

Related Stories

यजमान पाकची मालिकेत विजयी सलामी

Patil_p

लखनौ सुपरजायंट्सचा हैदराबादला पराभवाचा धक्का

Patil_p

कार्लसन-नेपोम्नियाची यांच्यातील तिसरी फेरीही बरोबरीत

Patil_p

गार्सिया ईस्ट बंगालचे साहायक प्रशिक्षक

Patil_p

फलंदाजीतील हाराकिरीचा भारताला फटका

Patil_p

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा युवेंट्सला निरोप

Patil_p
error: Content is protected !!