Tarun Bharat

ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टरमध्ये दाखल

Advertisements

वृत्तसंस्था/ मँचेस्टर

पोर्तुगालचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे ब्रिटनमध्ये नुकतेच आगमन झाले असून तो आता मँचेस्टर युनायटेड संघात दाखल होणार आहे.

अलीकडेच रोनाल्डोची युवेंटस संघातून मँचेस्टर युनायटेड संघामध्ये बदली झाली होती. आगामी प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेसाठी मँचेस्टर युनायटेड संघाने रोनाल्डोशी करार केला आहे. गुरुवारी मँचेस्टरच्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर रोनाल्डोचे मँचेस्टर युनायटेड क्लबच्या वरि÷ अधिकाऱयांनी खास स्वागत केले.

36 वषीय रोनाल्डोने गेल्या बुधवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नोंदविला होता. रोनाल्डोने विश्व करंडक फुटबॉल पात्र फेरीच्या आयर्लंड विरुद्ध सामन्यात दोन गोल नेंदवून यापूर्वीचा अली दाईचा 109 गोलांचा विश्वविक्रम मागे टाकला. मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळताना रोनाल्डोला 7 क्रमांकाची जर्सी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Related Stories

कोल्हापुरच्या लाल मातीत घुमणार राष्ट्रीय कुस्तीचा शड्डू

Abhijeet Shinde

मणेराजूरी येथील युवकाची शेकोबा डोंगरावर गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

विसापूर येथे मोटर सायकलवरून पडून एकाचा मृत्यु

Abhijeet Khandekar

पाकिस्तानात कोरोनाची तिसरी लाट; 7 शहरांमध्ये कडक लॉकडाऊन

datta jadhav

महापालिका निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसची बाजी

Patil_p

काबूल बॉम्बस्फोटानंतर राशिद खानची भावूक पोस्ट, म्हणाला…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!